⚡🌧पाऊस गाणे🌧⚡
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस
*स्वर-पुष्पा पागधरे*
आभाळा..त आले..काळेकाळे ढग
आभाळा..त आले..काळेकाळे ढग
धारा, कोसळल्या.. निवे तगमग
धारा, कोसळल्या.. निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या, श्वासांत ग..
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या,वासात ग अ
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
कोसळल्या कशा सरीवर सरी...
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी...
कोसळल्या कशा सरीवर सरी...
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी...
लाल ओहळ,लाल ओहळ,वाहती जोसात ग
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग अ
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस
⚡⚡🌧🌧⚡⚡🌧🌧⚡⚡
वीज कडाडता.. भय दाटे, उरी..
एकली मी इथे..एकली मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकुळ,मन व्याकुळ, सजणाच्या,ध्यासात ग..
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग अ
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस,आला पाऊस
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment