तो-हो हो... हो हो.. हो हो..हो हो
ती-हो हो... हो हो.. हो हो..हो हो
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
तो-धरणी आईची माया, कशी जाईल वाया
ती-धरणी आईची माया, कशी जाईल वाया
दोघे-हो,लई दिवसानं, हा, लई नवसानं,
लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
*स्वर-आशा भोसले,महेंद्र कपूर*
तो-वैशाख वणवा सरला हो,
मृगाचा पाऊस झरला हो..
वैशाख वणवा सरला हो,
मृगाचा पाऊस झरला हो
ती-देवाची किरपा झाली,
ही सुखांत काया न्हाली
देवाची किरपा झाली,
ही सुखांत काया न्हाली
दोघे-हो,लई दिवसानं, हा, लई नवसानं,
लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
ती-झुळझुळ पानी पाटांत,
सुख मावंना पोटात...
झुळझुळ पानी पाटांत,
सुख मावंना पोटात
तो-फुलून काळिज आलं
अन् हिरवं लेनं ल्यालं
फुलून काळिज आलं
अन् हिरवं लेनं ल्यालं
दोघे-हो,लई दिवसानं, हा, लई नवसानं,
लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
*चित्रपट-फटाकडी*
तो-घामाचं झालं मोती हो,
लाखाची दौलत हातीं हो...
घामाचं झालं मोती हो,
लाखाची दौलत हातीं हो
ती-खळ्यांत पडली रास
आता सोन्याचा खाऊ घास
खळ्यांत पडली रास
आता सोन्याचा खाऊ घास
दोघे-हो,लई दिवसानं, हा, लई नवसानं,
लागलंय आभाळ गाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया
धन्यवाद 🙏🙏🙏
No comments:
Post a Comment