Saturday, 19 June 2021

आई तुझं लेकरू

आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
*स्वर-जयवंत कुलकर्णी*

या दुनियेची,रीतच न्यारी
आजचा मैतर,उद्यास वैरी
मतलब सरतां,लाथा मारी..
पाय कुणाचं धरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता..चुकलंय,
सांग मी काय करू
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वनवासी मी ईथं एकला
आईस मुकलो गांव सोडला
मायेचा ग,आधार तुटला..
तळमळतंय वासरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू
😕😕😕😕😕😕😕
तुजविण आतां कुणी न वाली
तूच बाप अन्‌ मायमाउली
दे पदराची,तुझ्या सावली..
तडफडतंय पाखरू..
सांग मी काय करू..
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
आई तुझं लेकरू, येडं ग कोकरू
रानांत फसलंय, रस्ता चुकलंय,
सांग मी काय करू

No comments:

Post a Comment