Saturday, 31 July 2021

गणेश वंदना (गणगवळण)

🙏गणगवळण(श्रीगणेश वंदना)🙏
🌷स्वर- विठ्ठल शिंदे, विष्णू वाघमारे 🌷
🙏 सौजन्य- रविंद्र झांबरे 🙏
लवकर यावे सिद्ध गणेशा 
लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा 
( लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा)
माझा भरवसा तुम्हावरी खासा 
माझा भरवसा तुम्हावरी खासा 
वैरी पळविला दाही दिशा...
वैरी पळविला दाही दिशा...
लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा
(   लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा)
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
पहीलं पाऊल पहिला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 

देवादीकानो हे रसिकानो
आशीर्वाद द्या तुमचा हो 
देवादीकानो, हे रसिकानो...
(कोरस)
तालावरती सुर लागता 
खेळ रंगला आमचा हो 
पहीलं पाऊल पहिला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
(कोरस)
येती अप्सरा करीती नखरा 
कवन सागरा ये भरती 
सुदबुद हरली तहानभूक सरली 
नाचू लागली मदनरती 
पहीलं पाऊल पहीला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती
🙏 धन्यवाद मंडळी 🙏

No comments:

Post a Comment