Sunday, 16 May 2021

जय महाराष्ट्र हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी

जय महाराष्ट्र..जय महाराष्ट्र 
हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी
ते सर्व मराठे आम्ही साडेदहा कोटी 
ऐक्याची शपथ घेऊया काय मग कोटी
झाकून कधी काळीचे 
दैन्य भाळीचे दिसं सोन्याचे 
भविष्यापोटी जी.. जी 
भविष्यापोटी जी.. जी ...
राज्य मराठी नागपुराहून गोव्या पर्यंत 
पैठणेकडे पसरे तिकडे दर्या अपरांत 
तापी वरदा वाहते झुळझुळ तशी वैनगंगा..
तशी वैनगंगा..
अन् भिमा गोदा कृष्णा आणीती जीवन रसरंगा
जीवन रसरंगा,आणीती जीवन रसरंगा
हा दगड फुलांचा मर्द मराठी देश 
कनीकोंडा खाया अंगी फाटका वेष 
परी नसानसातुन संचरतो आवेश 
स्वातंत्र्य देवीचे भक्त उसळते रक्त ईमानी सख्त 
साक्ष परमेश जी..जी 
साक्ष परमेश जी..जी ...
परिमळा माझी कस्तुरी फुलात फुल मोगरी 
जीरंहा जीरंह जीरंह जीजी 
इये मराठीची ऐ घरी,विद्येचा सुकाळू करी 
ती अद्भुत ज्ञानेश्वरी,तुकोबांची भावपंढरी 
ईथे कडेकपारी मधुन,घुमली शाहीरी जी जी 
घुमली शाहीरी जी जी 
होश जहाल चिपळूनकरी,केशवसुत देती ललकारी न्
गर्जती टीळक केसरी..
हरिभाऊंची कादंबरी 
ज्योतिबा धरती अंतरी,अण्णांची नाट्य चातुरी 
देवलांची कोणाला सरी,पुढे कोल्हटकर गडकरी न्
पठ्ठे बापूराव फडकरी,शाहीर हैदर लहरी 
बालकवि निर्झरापरी,केळकर नर्म चातुरी 
सानेगुरुजी भाव निर्झरी,तांब्याची गोड ललकारी
गोड ललकारी जी जी 
गोड ललकारी जी जी 
या मराठीच्या मंदिरी,आसनावरी,थोर कितीतरी 
शारदा पुत्र किर्तीवंत..
कवि कथाकार कलावंत 
किती शाहीर किती संत जी जी 
किती शाहीर किती संत जी जी 
अजंठ्याची कला काय खुले,नागपुरात वैभव झुले 
जीरंहा जीरंह जीरंह जीजी..
वऱ्हाडात कपाशी उले,कृष्णा किनारी शाळू डुले 
कोकणची फळे अन फुले,मुंबईला बघून मन भुले 
हो, मुंबईला बघून मन भुले 
जय महाराष्ट्र गर्जती धरतीची मुले जी जी 
धरतीची मुले जी जी 
मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा..
मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा
धरा मानाचा आणा,त्यांचा त्यागाचा बाणा 
नाही भ्याले मरणा,शिवराय बाजी तानाजी 
ते धनाजी नी संताजी,पेशवाई पहिला बाजी 
अभिमन्यू परी जनकोजी,राघो भरारी नी महादजी 
महादजी हो गोखला बापू रणगाझी,हा हा जी जी, 
हा हा जी जी,हा हा जी जी 
सत्तावन सालचे बंड पेटले चंड 
राहू काय थंड ठोकूनी दंड ठोकूनी दंड..
मराठे प्राण देती समरात 
मर्दानी झाशीवाली हो त्यात 
सायबानं हाय खाल्ली युध्दात जी जी 
सायबानं हाय खाल्ली युध्दात जी जी 
आम्ही नेक मराठे हिंद भुमिचे पुत्र 
आम्ही पूज्य मानतो एकच हिंदी छत्र
आमुचे आम्हाला घर राहूदे मात्र 
ही एक आमुची आस एक हा ध्यास 
याच घोषात करु सर्वत्र जी जी 
करु सर्वत्र जी जी..
सह्याद्रीचे पिऊनी वारे कृष्णेचे पाणी 
हा.. कृष्णेचे पाणी 
वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जय गाणी 
गाती जय गाणी मराठे गाती जय गाणी 
*स्वर-शाहीर पिराजीराव सरनाईक*
*सौजन्य-रविंद्र झांबरे*

No comments:

Post a Comment