Monday, 13 February 2017

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार
================

बोटावर मोजण्या ईतके मराठा लोक सोडले तर ईतर सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती काय आहे ?
    मराठा समाज पिढ्यांपिढ्या शेतीवर गुजराण करत आला आहे . सत्ताधारी कुणीही असो सर्वांनीच शेतकरी समाजाच्या ( जो बहुसंख्य मराठा आहे ) तोंडाला पाने पुसली आहेत . शेतकऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केले आहे , कुठल्याही ठोस योजना राबवल्या नाहीत .
एकतर शेती व्यवसाय बेभरवशाचा , निसर्गावर अवलंबून , त्यातही शेतीमालाला हमीभाव नाही आणि यावर कडी म्हणजे दलाल पध्दत ... यात पिळवटलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले नाही तर नवलच ...!!!
आरक्षणाचा विषय निघाला की अनेक तथाकथित विद्वानांची ओरड सुरू होते .. मराठा सधन आहे , सामाजिक दृष्टीने उच्च आहे , राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे ....!!!
    अरे होय बाबा ..पण तुम्ही कुठल्या मराठ्यांच्या विषयी बोलताय ..??? आणि ते किती टक्के आहेत ...???   सर्वसामान्य मराठ्यांच्या विषयी यांना किती कळवळा आहे ...??? या लोकांना प्रतिनीधी मानून सर्व मराठा सधन वर्गात मोडतो का ...???
        मराठ्यांच्या एकूण लोकसंख्ये पैकी साधारणपणे ३०% मराठा आज भुमीहीन आहे , ५०% मराठा अल्पभुधारक आहे , १५% मराठा मध्यम वर्गीय जीवन जगत आहे तर ५% मराठा ज्यांना सधन म्हणतात अशा वर्गात मोडतो ...!!!
मराठा समाजाच्या अधोगतीची काही प्रमुख कारणे -
* आरक्षण -  सर्वसामान्य मराठा जो भुमीहीन किंवा अल्पभुधारक आहे , ईतका पिचलेला आहे की त्याला कुठली शाश्वत कमाई नाही .मजुरी करुन वा थोड्या फार जमीनीतील उत्पन्नावर उदरनिर्वाह करत आहे . या कचाट्यातुन सुटका मिळवण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण द्यायचे झाले तर आरक्षण नाही तसेच फि भरण्याचीही ऐपत नाही . म्हणजे दोन्ही दरवाजे बंद ...
आई जेवण देत नाही आणि बाप भीक मागु देत नाही ...!!!
अशा कोंडीत सापडलेला सर्वसामान्य मराठा आज हतबल झालेला आहे .
     " अशक्त असलेल्या घोड्यांना वेगळा चारा देण्याच्या नादात पुर्वी जे सशक्त घोडे होते ते रोडावले आहेत ....!!!"   त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज अजूनही कुणाला जाणवल्याचे दिसत नाही ...!!!
   मान्य आहे आरक्षणाने समाजाचे सर्व प्रश्न सुटत नसतात पण गती मिळते हे निश्चित ...!!!
*राजकारणातील स्वकीय्य -
   हे लोक फक्त बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा वोट बँक म्हणून वापर करून घेतात . स्वतः मोठमोठी पदे पदरात पाडून गब्बर होतात . पण ज्यांच्यामुळे आपण या पदावर आहोत त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात ...!!!
अनेक सहकारी क्षेत्रे , शिक्षणसंस्था यांच्याकडे आहेत पण  सर्वसामान्य गरीब मराठ्यांच्या साठी येथे हक्काचे स्थान असावे असे त्यांना कधीही वाटले नाही . शक्य असतानाही गोरगरीब स्वकीय्यांसाठी त्यांनी काही केल्याचे जाणवत नाही ...!!!
विधानसभेत अर्ध्यापेक्षा जास्त आमदार मराठाच असतात तरीही मराठा समाज दुर्लक्षीत राहतो हे कशाचे लक्षण आहे ?

कालबाह्य बेदरकार वृत्ती  -
     २१ व्या शतकात १७ व्या १८ व्या शतका सारखे जगण्याची कला आजही अनेक मराठा तरुणांमध्ये दिसुन �येते...!!!
आजचे युग हे तांत्रिक शिक्षणाचे , स्पर्धेचे युग आहे . येथे पुर्वी असलेला रुबाब वा बेदरकारी वृत्ती बिनकामाची आहे हे बहुतेक मराठा तरुणांनी मनावर घेतल्याचे जाणवत नाही . उच्च शिक्षणाची आस धरून योग्य क्षेत्रात बस्तान बसवने ही काळाची गरज या तरुणांनी लक्षात घ्यायला हवी . शेती धारकांनी कृषी क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतले पाहिजे , आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करायला पाहिजे .ज्यांच्याकडे लागवडी योग्य जमीन नाही त्यांनी ती विकुन वायफळ खर्च करण्या ऐवजी माहीती असलेल्या उद्योगात गुंतवणूक करावी , आपला आर्थिक पाया प्रथम मजबूत करून घ्यावा .
   असे न झाल्याने आज मराठा समाजाचे मागासलेपण प्रकर्षाने जाणवत आहे .
       महाराष्ट्राच्या एकुण लोकसंख्ये पैकी ३५% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाचे उमेदवार तसेच मतदार महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्षात विभागले आहेत , हरकत नाही ...!!!
       आज योगायोगाने म्हणा ,राजकीय खेळी म्हणा किंवा आणि काही म्हणा पण  अनेक वर्षापासून असलेली मराठा समाजाची घुसमट कोपर्डी प्रकरणा पासून बाहेर पडत आहे , मराठा समाज कधी नव्हे तो एकत्र दिसत आहे ... ही चांगल्या गोष्टीची , समाजाच्या हिताची नांदीच म्हणावी लागेल ...!!!
    संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांचे महामोर्चे कुठलेही गालबोट न लागता पार पडत आहेत , प्रतिसाद प्रचंड आहे ...!!!
      हीच एकजुट पुढे टिकवून येणार्या सर्व निवडणुका मधे याचे पडसाद उमटले पाहिजेत, सरकार वर दबाव आला पाहिजे . यासाठी येणार्या सर्व निवडणुकात सत्ताधारी उमेदवारांना पराभुत करण्यासाठी निर्धार केला पाहिजे , येथे आपल्या जाती वा पक्षा विषयी असलेल्या सर्व वृथा भावना दुर सारून सत्ताधारी उमेदवारास तुल्यबळ असलेल्या उमेदवारास आपले बहुमुल्य मत द्यावे लागेल , भले मग तो कुठल्याही पक्षाचा असो वा कुठल्याही जातीचा ...!!!
संपूर्ण समाजाच्या हितासाठी असे कडवट निर्धार करण्याची वेळ आता आली आहे , त्याच्याशिवाय तुमच्याकडे कुणी डुंकूनही पाहणार नाही , अहो प्रत्यक्ष जन्मदाती आई सुद्धा आपल्या लहान बाळाला रडायला लागल्या शिवाय कडेवर घेत नाही , जोपर्यंत खेळतयं , बागडतयं तोपर्यंत ती त्याच्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही ...!!!
महाराष्ट्रात ३५% असलेला मराठा समाज जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सत्ता फिरवू शकतो हे सर्व राजकीय पक्षांना समजुद्या ...!!!
    तुमच्या मतांवर पदे भुषयुन तुमचा वापर फक्त निवडणुका पुरता करणार्या सर्व पक्षीय मराठा नेत्यांना समजुद्या ...!!!
     मग पाहा कसे सगळे खडबडुन जागे होतात ...!!!
    हे एवढे सर्व मराठा बांधवांनी केले तरच " एक मराठा लाख मराठा "  हा एल्गार यशस्वी होईल यात शंका नाही ...!!!
        जयोस्तू जयोस्तू जयोस्तू ... हिंदू - मराठा ...!!!

आपलाच ,
एक मराठा ,
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी , हवेली ( पुणे )

Saturday, 4 February 2017

झांबरे ( Zambare ) आडनावाचा ईतिहास

प्रत्येक जिज्ञासु व्यक्तिला आपल्या पुर्वजांचा ईतिहास माहीती व्हावा ही ईच्छा असते . आपले आडनाव अमुकच कसे ...??? हे ही जाणुन घेण्याची ईच्छा असते ... तशी ती मला ही जाणवली , थोडा शोध केल्यावर थोडीफार माहीती मिळाली ...!!! मला ज्ञात असलेला झांबरे आडनावाचा ईतिहास पुढील प्रमाणे ... शिवपुर्व काळात पवार आडनावाचा सरदार सुमारे ५०० वर्षापूर्वी (किंवा त्याहून अधिक ) महाराष्ट्रात होऊन गेला .त्याच्या कडे झांबरा नावाचा एक पाळलेला कुत्रा होता. हा कुत्रा शिकारीला ,लढाई ला नेहमी या सरदारा सोबत राहत होता . सरदाराला या कुत्र्याचा खूप लळा लागला होता . असेच लढाई ला गेले असता परत येताना हा कुत्रा घरी आला नाही युध्दात कुठे तरी हरवला कि काय ? हे लक्षात आल्यावर सरदार खुप दु:खी झाला ,ईमानी कुत्र्याच्या ,आठवणीने व्याकुळ होऊन शेवटी आजारी पडला . अखेरच्या क्षणी त्याने आपल्या सर्व मुलांना जवळ बोलवले ,आणि त्याच्या प्रिय कुत्र्याच्या स्मृति प्रित्यर्थ त्याने आपले आडनाव पवार ऐवजी झांबरे करावे ... असे मुलांच्या कडुन वचन घेतले ,मुलांनी वचन पाळले, आणि झांबरे हे आडनाव पुढे प्रचलीत झाले ...!!! झांबरे आडनावाची ऐतिहासिक माहिती - शिवपुर्व काळात पुणे (कसबे पुणे ,पुनवडी ) येथील मुळा मुठा नदीच्या काठी झांबरे पाटलांचे टोलेजंग वाडे होते , पाटलांची चावडी होती, येथे पुण्यातील सर्व न्याय निवाडे होत असत . ही झांबरे चावडी आजही पुण्यात कसबा पेठेत आहे . येथील तांबडी जोगेश्वरी उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे . बाल शिवाजी जेंव्हा पहिल्यांदा जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शहाजी राजांच्या सांगण्या वरून पुणे परगण्याची व्यवस्था पाहण्यासाठी पुण्यात आले तेंव्हा सुरूवातीला झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत होते . पुढे झांबरे पाटलांच्या जागेत लालमहाल बांधुन तिथे निवास व्यवस्था करण्यात आली ...!!! पानिपतच्या तिसर्या युध्दात सरदार शहाजी (सहजी ) झांबरे हे पंचहजारी मनसबदार पेशव्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या बरोबर सामिल होते ...!!! पेशवे कालीन शाहीर सगनभाऊ यांनी आपल्या पानिपतच्या पोवाड्यात सरदार झांबरे यांचा ऊल्लेख शुर अतिरथी असा केल्याचे आढळते ...!!! पुण्यात कसबा पेठेतील झांबरे चावडी व मुकुंदनगर येथील झांबरे पँलेस या वास्तु पुण्यातील आकर्षण मानले जाते . मंगळवार पेठेत एका रस्त्याचे नाव ज्येष्ठ गांधीवादी श्री . तात्यासाहेब रामराव झांबरे पाटील असे आढळते . हडपसर पुणे जवळील झांबरेपाटील नगर , होळकरवाडी येथे श्री. अनंत दिगंबर झांबरे पाटील यांच्या तर्फे "पतंजलि योग विद्याश्रम" नावाने सुप्रसिद्ध योग केन्द्र चालवले जाते .हज़ारों लोक ईकडे योग विद्या आत्मसात करून निरोगी आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहेत ...!!! झांबरे कुटुम्बियांचे सध्याचे वास्तव्य - झांबरे कुटुम्बियांचे सध्याचे वास्तव्य पुणे शहरात आहे तसेच हडपसर जवळील होळकरवाडी ता . हवेली जि. पुणे या गावात जवळपास ७०% झांबरे आडनावाचे लोक वास्तव्यास आहेत .डोंगरसोनी ता . तासगाव जि . सांगली येथेही झांबरे कुटुम्बिय मोठ्या प्रमाणात आहेत . सोलापुर, जळगाव, भुसावळ व वाशीम या शहरांच्या ठिकाणी ही झांबरे आडनाव अधिक प्रमाणावर आढळून येते ...!!! My email - ravindrakzambare@gmail.com संदर्भ- राजा शिवछत्रपती- लेखक, महाराष्ट्र भुषण आदरणीय श्री बाबासाहेब पुरंदरे. पानिपत - लेखक, श्री विश्वास पाटील पानीपतचा पोवाडा - पेशवे कालीन शाहीर सगनभाऊ. हे ही पाहा ...... http://www.google.co.in/url?q=http://googleweblight.com/%3Flite_url%3Dhttp://www.maayboli.com/node/38694%26ei%3DOTjOj_UT%26lc%3Den-IN%26geid%3D10%26s%3D1%26m%3D518%26ts%3D1454775605%26sig%3DALL1Aj4WTgBzZNRHtJL24Kd6KOY0fEecdA&sa=U&ved=0ahUKEwiJ9K65xePKAhXIOj4KHXmVA7cQFggPMAA&sig2=33sOWkS0kWVdnfDYh0SrKw&usg=AFQjCNHGphKZY3y72EmjxGwuv26iWdbVrA http://www.google.co.in/url?q=https://m.facebook.com/permalink.php%3Fid%3D513781378661367%26story_fbid%3D555231067849731&sa=U&ved=0ahUKEwiZ_LK2v-PKAhVDOj4KHQk6D7gQFggPMAA&sig2=W_8NhfvSRrChEoCjbNWvuw&usg=AFQjCNFriWGC7DSud5pM2RC-n0tqjsFV4w http://www.google.co.in/url?q=http://googleweblight.com/%3Flite_url%3Dhttp://www.dadojikonddeo.org/lekh.html%26ei%3DZdSreO3E%26lc%3Den-IN%26geid%3D10%26s%3D1%26m%3D518%26ts%3D1454773379%26sig%3DALL1Aj4WFM51_zVeTfPaj3bnznUw5NMHzA&sa=U&ved=0ahUKEwir_vCTvePKAhVMWz4KHe29ALkQFggiMAU&sig2=1Cq3lVQWlc13BIAgmYnuRQ&usg=AFQjCNE6eDKO2DAmm51nuYMduuzohfpvcg

ये हंसा वरती

ये हंसा वरती बसून शारदे
====================
ये हंसा वरती बसून शारदे
मयुरा वरती बसून ...
नेसुनी शुभ्र पातळ
गळा घालून मुक्ताफळं
कटी कंबरपट्टा कसुन शारदे
मयुरा वरती बसुन ...
करी घेऊनीया विना
करी मंजुळ गायना
ये सभेमध्ये हसून शारदे
मयुरा वरती बसून ...
तुका म्हणे ब्रम्हनंदीनी
मम् ह्रदयी विराजुनी
ये अंतर्ज्ञाना ठसुन शारदे
मयुरा वरती बसून ...!!!

Wednesday, 21 December 2016

चि. शिवप्रताप रविंद्र झांबरे , काटदरे हॉल , बदलापुर येथे कार्यक्रमात तबला वाजवताना ...!!!

माझी आवडती १० मराठी गाणी

१] टाळ बोले चिपळीला -

टाळ बोले चिपळीला , नाच माझ्या संग
देवाजीच्या दारी आज , रंगला अभंग
दरबारी आले रंक आणि राव , सारे एकरूप , नाही भेदभाव
नाचू गाऊ या हो सारे होऊनी निसंग ,देवाजीच्या ....
जनसेवे पायी काया झिजवावी ,
घाव सोसुनीया मने रिझवावी ,
देऊनीया ताल बोलतो मृदंग,
देवाजीच्या .....
ब्रम्हानंदी देह होऊनीया जाई,
एकएक खांब वारकरी होई,
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ,
देवाजीच्या ...

२] जाऊ देरे कमल नयना -

जाऊ देरे कमल नयना जाऊ देरे कमल नयना ,
बासरी तुझी बासरी तुझी बासरी रे ,
पाहीली मी आज रे पाहीली मी आज रे ...
यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे
जाती सुटे पंथ कृष्णा
वाट माझी सोडना ,
जाऊ देरे कमल नयना ....
घरी सासु सासर्याचा जाच मला भारी ,
सासु मोठी भांडखोर , घराबाहेर करी ,
पतीलाही राग येतो ,
जीव माझा राहीना ,
जाऊ देरे कमल नयना ...
पतीव्रता नेम घरा माझ्या सारा ,
तुझ्यामुळे संसार माझा ,
�झाला पाठमोरा ,
एका जनार्दनी ,
चुकल्या येरझारा ,
जाऊ देरे कमल नयना ,
जाऊ देरे कमल नयना ,
बासरी तुझी बासरी तुझी बासरी रे ,
पाहीली मी आज रे ,
पाहीली मी आज रे ....!!!

३] गोपाला गोपाला -

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ,सांभाळ ही तुझी लेकरे ,
पुण्य समजती पापाला ...
ही धोंड्याला म्हणती देवता ,
भगत धुंडती तया जोगता ,
स्वतःच देती त्यास योग्यता ,
देव म्हणूनी कुणी न भजावे ,
फुका शेंदरी दगडाला ,
गोपाला गोपाला ...
कुणी न रहावे खुळे अडाणी ,
शिक्षण घ्यावे व्हावे ज्ञानी ,
यासाठी ही झिजते वाणी ,
मी जातीचा धोबी देवा ,
धुवीन कपडा मळलेला ,
गोपाला गोपाला ...
हेच मागणे तुला श्रीहरी ,
घाम गाळी त्या मिळो भाकरी ,
कुठेच कोणी नको भिकारी ,
कुणी कुणाचा नको रिणकरी ,
कुणी न वीटो नर जन्माला ,
गोपाला गोपाला ...!!!

४] कानडा राजा पंढरीचा -

वेदानाही नाही कळला ,
अंतपार याचा ,
कानडा राजा पंढरीचा ...
निराकार तो ईश्वर ,
कसा प्रकटला असा वीटेवर,
उभय ठेवीले हात कटीवर ,
पुतळा चैतन्याचा ,
कानडा राजा....
परब्रम्ह हे भक्तासाठी ,
मुके ठाकले भिमेकाठी ,
उभा राहिला भावसावयव ,
जणू की पुंडलीकाचा ,
कानडा राजा पंढरीचा ...
हा नाम्याची खिर चाखतो ,
चोखोबांची गुरे राखतो ,
पुरंदराचा हा परमात्मा ,
वाली दामाजींचा ,
कानडा राजा पंढरीचा ....!!!

५] आधी गणाला -

आधी गणाला रणी आणला ,
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ...
धन्य शारदा ब्रम्ह नायका ,
घेऊन येईल रूद्र विना ,
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा ,
दावील यंत्र खुणा खुणा ,
नाहीतर रंग .....
सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू ,
मेरू वरचा गुरु आणा आणा ,
ब्रम्हांडा भोवता तो एक सवता ,
दिवाच लावील मना मना ,
नाहीतर रंग पुन्हा ...
माझ्या मनाचा मी तु पणाचा ,
जाळून केला चुना चुना ,
पट्ठे बापुराव कवी कवनाचा ,
हा एक तुकडा जुना जुना ,
नाहीतर रंग ...!!!

६] मुंबई गं नगरी

मुंबई ग नगरी बडी बाका ,
जशी रावणाची दुसरी लंका ,
वाजतो ग डंका ,
डंका चहू मुलखी ,
राहण्याला गुलाबाची फुलकी ,
पाहीली मुंबई मुंबई ...
मुंबई ग नगरी सदा तरणी ,
व्यापार चाले मन भरूनी ,
दर्याच्या ग वरूनी ,
वरूनी जहाजे फिरती ,
अगं बोटीची निराळी धरती ,
पाहीली मुंबई मुंबई ....
बोरीबंदर कोट किल्ला ,
कामाच्या ग मैदानातला ,
कमीटीचा बंगला देतो ,
भेटी खालती ,
ताजमहाल पॅलेस हॉटेल ,
तिथेच तुला भेटेल सासर ,
ईच्छा भोजन मेजवानी ,
मजेदार ती ,
सेक्रेटरी हॉल तुला ,
काळा घोडा बहाल ,
कुलाब्याच्या दांडीवरची हवा ,
थंडगार ती ....
ट्रामगाड्या मोटारगाड्या ,
हजार देतो खटारगाड्या ,
व्हिक्टोरीया नव्या गाड्या ,
रंग भरती ,
लगबग भारी चाले ,
गोंधळ सारा रस्त्यात माजे ,
मोटारींची चाले बघ ,
ईथे गर्दी ...
परळ पासुन सरळ रस्ता ,
भायखळ्याच्या पुलावरचा ,
तिथून पुढे धाप लागेल ,
उन्हाखालती ,
जमशेदजी बाटलीवाला ,
याचा दवाखाना तुला ,
ईनाम दिला राहण्याला ,
बिनवारशी ,
बटाट्याची चाळ ,
तुला  कायमची बहाल ,
तिथं बांधुनीया चाळ ,
मग ताल धरशी ...
पवळे जपून चाल ,
पवळे जपून चाल ,
घाई घाईत होतील हाल ,
धर हात सावरी तोल
धर हात सावरी तोल
हा पट्ठे बापुचा बोल
हा पट्ठे बापुचा बोल,
अगं ही मुंबई मुंबई .....
पाहीली मुंबई मुंबई ....!!!

७] एकवार पंखावरूनी -

एकवार पंखा वरूनी
फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे
तुझ्या अंगणात ...
धरेवरी अवघ्या फिरलो
निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हा मध्ये न्हालो
कधी चांदण्यात कधी चांदण्यात
एकवार ....
फुलोरूनी पंखे कोवळी
तुझ्या पुढे नाचे राणी
तुझ्या मनगटी ही वसले
कुणी भाग्यवंत
एकवार ....
मुका बावरा मी भोळा
पडेन का तुझिया डोळा
मलीन पणी कैसा येऊ
तुझ्या मंदिरात तुझ्या मंदिरात
एकवार ....!!!

८] हे गजवदन

हे गजवदन वदन वदन ,
नाचे रणांगना गण नाचे रणांगना ...
आधी तुझे नाव घेऊ ,
सभे मध्ये ऊभे राहु,
आनंद आनंद आनंद आनंद ,
होईल माझ्या मना ,
होईल माझ्या मना ,
हे गजवदन ....
कानी कुंडल वनमाळा ,
शोभे कस्तुरीचा टिळा ,
पार्वतीच्या बाळा बाळा ,
वाजवी ब्रम्हविना ,
हे गजवदन ...
हरी कवी चाल काढी ,
सप्तगण बाण सोडी ,
तोडुया तोडुया तोडुया तोडुया ,
वैर्याच्या माना रणा ,
हे गजवदन ....!!!

९] * हे शिवशंकर  *

हे शिवशंकर गिरीजा तनया
नमन तुला ईश्वरा
शुभ्र कार्याच्या शुभ्र प्रारंभी
नमन तुला ईश्वरा ...
वंदन करूनी तुजला देवा
रसिक जनांची करीतो सेवा
कौतुक होऊनी आम्हा मिळावा
सन्मानाचा तुरा
हे शिवशंकर ...
प्रसन्न होऊनी विघ्न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश किर्तीला
बहर येऊ दे नवा
हे शिवशंकर ...!!!

१०] हे हिंदू नृसिंहा ...

हे हिंदू शक्ती संभूत दिप्तीसम तेजा
हे हिंदू तपस्या पुत ईश्वरी ओजा,
हे हिंदूश्री सौभाग्य भुतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा !
करी हिंदूराष्ट्र हे तुते ... वंदना ,
करी अंतकरण तुज हे ... अभिनंदना,
तव चरणी भक्तिच्या चर्ची ... चंदना,
गुढाशा पुरवी त्या न कधु शकतो ज्या ,
हे हिंदू नृसिंहा ...
हा भग्न तट असे गडागडाचा आजी,
हा भग्न जयदुर्ग आसवा माजी ,
ही भवानीचीया पुन्हा गंजली धारा ,
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा ,
गडकोट जंजीरे सारे ... भंगले,
जाहली राजधान्याची ... जंगले,
परदास्य पराभवी सारी ...मंगले,
या जगती जगू ही आज गमतसे ... लज्जा ,
हे हिंदू नृसिंहा ....
जी शुध्दी ह्रदाची रामदास शीर डुलवी ,
जी बुध्दि पाच शाह्यास शत्रुच्या झुलवी ,
जी युक्ती कुटनीतीत खलाशी बुडवी ,
जी शक्ती बलोन्मत्तास पददली तुडवी ,
ती शुध्द हेतूची कर्मी ... राहूदे,
ती बुध्दि भाबड्या जीवा ...लाहुदे,
ती शक्ति शोषिता माजी ...वाहूदे ,
दे पुन्हा मंत्र जे दिले समर्थे तुज ज्या ,
हें हिंदू नृसिंहा ...!!!

Friday, 5 August 2016

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

प्रचलित असलेल्या व नामशेष झालेल्या सर्व संस्कृती पेक्षाही हिंदू संस्कृती अति प्राचीन आहे . केवळ आपल्या सत्वबलानेच तिने आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवले आहे ...!!!
      काही आंधळे हत्तीची माहिती मिळवण्यासाठी गेले असताना त्यांच्या हाताला लागलेला एकएक अवयव हाच हत्ती आहे म्हणून भांडण करू लागले .
        त्याचप्रमाणे सनातन हिंदू संस्कृतीचा एकएक सिध्दांत उचलून अनेक भिन्न संप्रदाय प्रवर्तक हिच मुख्य संस्कृती आहे म्हणून भांडु लागले व आपापले संप्रदाय वेगळे केले . पुढे त्यातही फाटाफुट होऊन पुष्कळ मते मतांतरे झाली , अनेक फाटे फुटले . अशा या अनेक शाखोपशाखांनी सनातन आर्य संस्कृतीचा वटवृक्ष चोहीकडे फोफावला आहे .  पण ही यथार्थ भावना या पक्षोपक्षात नसल्याने ते विनाकारण आपसात द्वेष मत्सर करून कढतात व कुढतात ...!!!
       अंत:कलहामुळे तसेच परकीय आक्रमण व आघातामुळे ही संस्कृती पाहिजे तितकी जगभर पसरली नसली तरीही आपल्या विभुतीमत्वाने व महात्म्याने आजही विश्व मान्य व सुदृढ आहे ...!!!

एकिकडे आपल्या लोकांची ही अवस्था आहे तर दुसरीकडे मोठमोठे पाश्चिमात्य पंडीत हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचे गोडवे गाताना थकत नाहीत .
" India is mother land of philosophy "
असे स्पष्ट पणे नमूद करतात .

मॅक्समुल्लर नावाचा पाश्चिमात्य पंडित म्हणतो , " If I were to look over the whole world to find out country most richly endowed with all the wealth , power and beauty that nature can betsow, I should point to India "
     " If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts , has most deeply pondered over the greatest problems of life and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied plato and Kant, I should point to India ."

_
" दिव्य सुखाच्या प्राप्ती करता आवश्यक असणार्या सर्व देणग्यांनी , सर्व गुणांनी पराकाष्ठेचा विकास पावलेले मानवी मन ज्या देशात आपल्या पुर्ण कलेने शोभायमान आहे , मानवी जीवनाच्या निगुढ व अति महत्वपुर्ण विषयांवर खोल विचार करून ही कोडी ज्या देशात अत्यंत समाधानकारक रितीने सोडवली आहेत . प्लेटो व कान्ट या सारख्यांच्या तत्वज्ञानाचा पुर्ण अभ्यास करून समाधान मिळवलेल्या पाश्चिमात्य पंडितांची मने सुद्धा ज्याकडे आकर्षीत होतात . अशा दिव्य तत्वज्ञानाचा जन्म कुठे झाला असे कुणी विचारले तर मी सरळ हिंदुस्थानकडे बोट करीन "
" And if I were asked myself from what leaturature , we here in Europe , who are natured almost exclusively on the thoughts of the greeks and Romans and the semetic race , the Jewish , may draw the corrective which is most wanted in order to make our inner life more perfect , more universal , in fact more truly human , a life not for this life only , but a transfigured and eternal life  . I again should point to India  "

-
     ग्रीक, रोमन, युनानी व ज्यू ईत्यादींच्या विचार धारेने परिपोषीत आम्ही युरोपियन ज्या एका वाङमयाचा आधार घेऊन ठाम सिध्दांताला पोहचू , आमचे परमार्थिक जीवन पुर्ण होण्यास ज्याची आम्हाला जास्त आवश्यकता आहे , ज्याच्या मुळे आमचे जीवन अधिक विश्वव्यापी होईल , मानवी जीवनाला सर्वोतोपरी अधिक अनुरूप ठरेल , आमच्या विद्यमान जीवनात अधिक सुधारणा घडून येईल , केवळ ऐहीक नव्हे तर अनादीसिध्द् दिव्य जीवनालाही जे कारणीभूत होईल , निरतिशय सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणून जे वाङमय कोणत्या देशात आपल्या परिपूर्ण रुपाने अवस्थीत आहे म्हणून जर कुणी मला विचारले तर आपोआपच माझे बोलणे पुन्हा एकदा हिंदुस्थान कडे वळेल "

जकोलीयट नावाचा युरोपियन विद्वान आपल्या " The Bible of India  "  या पुस्तकात म्हणतो ,
" Astonishing fact  !  The Hindu revelation  (Veda) is of all revelations , the over one whose ideas are in perfect harmony with modern science as it proclaims the slow and gradual formation of the world  "

-

" सर्व धर्म ग्रंथांमध्ये हिंदूंचा वेद हाच असा एक ग्रंथ आहे की ज्याच्या विचारात सावकाश पणे  सृष्टीचा क्रम उपदेश असल्याने आधुनिक विज्ञानाशी जुळतात . "

      व्हिलर विल्लॉक्स हा अमेरिकन विद्वान म्हणतो .....

       " We have all heard and read about the ancient religion of India . It is the land of Vedas , the most remarkable works  , containing not only religious ideas on perfect life but also facts which all the science has since prooved true . Electricity , radium, electrons and airships all seems to have been known to the seers who found Vedas "

-

" भारताच्या अति प्राचीन धर्मा विषयी आम्ही पुर्ण वाचले आणि ऐकले आहे . भारत हे त्या अत्यंत महत्वपुर्ण आणि श्रेष्ठ वेदांचे जन्मस्थान आहे की ज्यात संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्वांचे एक केवळ विवेचन नसुन आजपर्यंतच्या अखिल विज्ञान शास्त्रांनी सिद्ध करुन प्रचारात आणलेल्या व सत्य म्हणून विश्वासन असणार्या अखिल सिद्धांतांचे ही विवेचन आहे . वीज , रेडीयम , इलेक्ट्रॉन्स आणि विमाने ईत्यादीचे ज्ञान ही तपोबलाने वेदांचा शोध लावणार्या त्या वेदद्रष्ट्या ऋषींना होते असे आढळते . आधुनिक विज्ञान शास्त्र म्हणजे वेदातील अबधित सिध्दांतांचे केवळ अनुकरण होय . "

     शोपेनहार युरोपियन विद्वान म्हणतो  -

     " In the whole world there is no study so beneficent and so elevating as that of Upnishadas .   It has  been the solace of my life and it will be solace of my death . "

-

   " मनुष्याच्या मनोभुमिकेस पराकाष्ठेच्या उन्नतीस पोहोचवून मानव जातीवर मोठे उपकार करणार्या या उपनिषदांच्या अभ्यासा खेरीज सर्व जगात ईतका लाभकारक व उन्नतीकारक असा कोणताही श्रेष्ठ अभ्यास नाही . उपनिषदेच माझ्या जीवनाचे समाधान , यांच्या आश्रयानेच मी नितांत सुख- समाधानाचे दिव्य जीवन अनुभवीत आहे . यांच्या छत्राखालीच शेवटी निरातीशय सुखशांतीने मी देहत्याग करीन . "
.
.
     भगवदगिते विषयी युरोपियन काय म्हणतात ते पाहा .......
हंबोल्स  -  
" Bhavatgita is the most beautiful , perhaps properly the only true philosophical song that exist in any known tongue . "
-
सर्व दृष्टीने अतिशय सुंदर किंबहुना जगातल्या सर्व भाषातील गितांमध्ये खर्या तत्वज्ञानाचा सर्वोतोपरी योग्य असा कोणता काव्य ग्रंथ असेल तर फक्त भगवदगिता . "

* वॅरेन हास्टींग्ज  - 
      " There is In Bhagvatgita , a sublimity of conceptions , reasoning and diction almost unequalled  "
-

     " गांभीर्यपुर्ण विचारसरणी , मनाला पटण्या सारखे विवेचन आणि लयबध्द छंद ईत्यादीकांनी भगवदगिता हा ग्रंथ जगात बिनतोड आहे ."

   * जर्मन विद्वान थोरो -  
    " Where is fear? when mother Geeta is there to protect ...!!! "
-

   " प्रत्यक्ष गितामाताच ईथे रक्षण करण्यासाठी निकट असताना भिती कधी शिल्लक राहणार ...??? "

        पुर्वी अनेक परकीय आक्रमकांनी येथे आपल्यावर राज्य करुन परस्परा मध्ये द्वेष वाढवला . ' विभाजन आणि शासन ' ( Divide and rule  )  हे तत्व आमलात आणून वाटेल त्या मार्गाने राज्य केले . आपण सर्वच त्यांच्या या कारस्थानाला बळी पडलो आणि आपसातील मत्सर वाढवत राहुन भांडत बसलो . आपल्या संस्कृती मधील चांगल्या गोष्टी बाजूला ठेऊन नको त्या अर्धवट गोष्टी उचलून वाद घालत  राहीलो ...!!!
    पण आता आपसातील सर्व भेदभावना आणि कुटील राजकारण बाजूला ठेवून बंधुत्वाच्या हार्दिक प्रेमाने परस्परांशी वागत आपल्या पवित्र संस्कृतीचा ध्वज उन्नत करून या उपदेशांचे निरवधी भाग्य अखिल विश्व लोकांना लाभो या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया ...!!!

-

   रविंद्र किसनराव झांबरे , मु.पो. - होळकरवाडी , हवेली , पुणे .
मो.- 9881917003

email- ravindrakzambare@gmail.com