Sunday, 1 August 2021

माऊली गुरू माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली

🌷🎵भैरवी 🎵🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
माऊली गुरू माऊली आआआ 
माऊली गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 

माऊली गुरू माऊली आआआ
माऊली गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 

माऊली..गुरू माऊली आआआ
माऊली..गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
महाराज ज्ञानेश्वर माऊली 
जय जय ज्ञानेश्वर मा..ऊली ईईई

चला जाऊ अलंकापुरी ईईई
सोनियाचा पिंपळ द्वारी
चला जाऊ अलंकापुरी ईईई
सोनियाचा पिंपळ द्वारी

चला जाऊ अलंकापुरी ईईई
सोनियाचा पिंपळ द्वारी
चला जाऊ अलंकापुरी ईईई
सोनियाचा पिंपळ द्वारी

माऊली..गुरू माऊली आआआ,
माऊली..गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
महाराज ज्ञानेश्वर माऊली 
जय जय ज्ञानेश्वर मा..ऊली ईईई

नदी इंद्रायणीच्या तिरी आआआ 
नदी इंद्रायणीच्या तिरी 
पोथी वाचावी ज्ञानेश्वरी 
हां, पोथी वाचावी ज्ञानेश्वरी

नदी इंद्रायणीच्या तिरी आआआ 
नदी इंद्रायणीच्या तिरी 
पोथी वाचावी ज्ञानेश्वरी 
हां, पोथी वाचावी ज्ञानेश्वरी

माऊली..गुरू माऊली आआआ,
माऊली..गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
महाराज ज्ञानेश्वर माऊली 
जय जय ज्ञानेश्वर मा..ऊली ईईई

माऊली..गुरू माऊली आआआ
माऊली..गुरू माऊली 
आमुची ज्ञानेश्वर माऊली 
महाराज ज्ञानेश्वर माऊली 
जय जय ज्ञानेश्वर मा..ऊली ईईई
🙏 धन्यवाद 🙏

सुखाचे हे नाम आवडीने गावे

🌹संतश्री चोखामेळा🌹
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
वाचे आळवा..वे,
वाचे आळवा..वे विठोबा..सी 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
🌷स्वर-गोदावरी मुंडे🌷
संसार सुखाचा,होईल निर्धा..र 
संसार सुखाचा,
संसार सुखाचा,होईल निर्धा..र 
संसार सुखाचा,होईल निर्धा..र 
नामाचा गज..र,
नामाचा गज..र सर्व का..ळ 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
कामक्रोधां..चे ना,चलेचि काही 
कामक्रोधां..चे ना,चलेचि काही 
आशा मनशा पा..हीं
आशा मनशा पा..हीं,दूर होती 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
🎵🎵🎵🎵🎵🎵🎵
आवडी धरो..नी,वाचे म्हणे हरिहरि 
आवडी धरो..नी,वाचे म्हणे हरिहरि 
म्हणतसे महरी
म्हणतसे महरी,चोखिया..ची
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
वाचे आळवा..वे,
वाचे आळवा..वे,विठोबा..सी 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें 
सुखाचे हे नाम,आवडीनें गावें
सुखाचे हे नाम,आवडीनें गा..वें
🙏 श्रीहरी 🙏

रम्य ही स्वर्गाहून लंका

🌹चित्रपट-स्वयंवर झाले सितेचे🌹
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
रम्य ही स्वर्गाहूनी लंका आआआ
हिच्या कीर्तीचा सागर लहरी 
हिच्या कीर्तीचा सागर लहरी 
नादविती डंका...
आआआ आआआ आआआ
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
🌷स्वर-मुकूंद फणसळकर🌷
आ आ आ आ आ
सुवर्णकमला परी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे
त्या कमलावर चंद्र निजकरे, करितो अभिषेका
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आ आ आ आ आ
लक्ष्मी लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी
या लंकेचे दासीपद तरी 
कमला,घेईल का ...
आआआ आआआ आआआ
रम्य ही स्वर्गाहूनी लंका
रम्य ही स्वर्गाहूनी लंका....आआआ
🙏 धन्यवाद 🙏

आला व्हता जवा शनीदेवा तुझा फेरा

ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
यां यां यां यांयां यांयां यां 
यां यां यां  यांयां यां....
ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
🌷स्वर-अशोक हांडे🌷
आला व्हता जवा,शनीदेवा तुझा फेरा...
आरं,आला व्हता,जवा शनीदेवा तुझा फेरा..
जन्माला आलो हितं 
कुत्री रडली मोजून तेरा 
मी जन्माला आलो हितं 
कुत्री रडली मोजून तेरा हे, 
ला ला ला लाला लाला ला
ला ला ला लाला ला
हे, ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
नशीबाचा खेळ झाला अडमतडम सारा...
आरं, नशीबाचा खेळ झाला अडमतडम सारा...
सायबाचा तोरा कुठं मी झालो ऐरागैरा 
आता, सायबाचा तोरा कुठं मी झालो ऐरागैरा हे, 
ला ला ला लाला लाला ला
ला ला ला लाला ला
अहा, ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
😌😌😌😌😌😌😌
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात,टाळक्यात हो
आन्,डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डीच्यांग,डीच्यांग हो....

झक्कास गातो गाणं 
तरी गाढवं जमती बारा...
आरं,झक्कास गातो गाणं 
तरी गाढवं जमती बारा...
आन्,नाचावं डांगचींगडीच्यांग
म्हणती ईंचू डसला का पोरा 
आन्,नाचावं डांगचींगडीच्यांग
म्हणती ईंचू डसला का पोरा हे, 
ला ला ला लाला लाला ला
ला ला ला लाला ला
अहा, ला ला ला लाला लाला ला
ला ला ला लाला ला....
🤔🤔🤔🤔🤔🤔
थकून झालो आडवा,म्हणती आळशी हाईस ढोरा... 
आरं,थकून झालो आडवा,म्हणती आळशी हाईस ढोरा 
ऐकून डोस्कं उठं,शाहण्या परीस येडा बरा 
आसं ऐकून डोस्कं उठं,शाहण्या परीस येडा बरा हे, 
ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
अहा, ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात बघा कुणी टाळक्यात बघा 
कुणी डोस्क्यात,टाळक्यात हो,
आन्,डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डांगचींगडीच्यांग ,डांगचींगडीच्यांग
डीच्यांग,डीच्यांग हो....
ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
ला ला ला लाला लाला ला...
ला ला ला लाला ला....
🌹चित्रपट-शेम टू शेम🌹

देव माणुस देवळात आला

🌹चित्रपट-कैवारी🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
धरमशाळेचं देऊळ झालं,चमत्कार झाला..
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
या उजाड माळावरती माझ्या देवानं केली प्रीती
या उजाड माळावरती माझ्या देवानं केली प्रीती
फुलबागेचं रूप पाहुनी
फुलबागेचं रूप पाहुनी हरपून जीव गेला
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात
गेला अंधार सरली रात, नारायणाचा फिरला हात
दारिद्रयाच्या अंगावरती 
दारिद्रयाच्या अंगावरती किरणांचा शेला
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
वस्ती-वाडी खुळी झोपडी, मायलेकरं येडीबागडी
वस्ती-वाडी खुळी झोपडी, मायलेकरं येडीबागडी
भगवंतानं भोळेपणाचा
भगवंतानं भोळेपणाचा उद्धार लई केला
देवमाणूस देवळात आला हो 
देवमाणूस देवळात आला 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
धरमशाळेचं देऊळ झालं,
धरमशाळेचं देऊळ झालं
चमत्कार झाला
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
देवमाणूस देवळात आला हो, 
देवमाणूस देवळात आला 
🙏 🌹जय हरि🌹 🙏

Saturday, 31 July 2021

आदेश बोलो बाबा आदेश

🙏सौजन्य-रविंद्र झांबरे 🙏
गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः, गुरुः देवो महेश्वरा...
गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः, गुरुः देवो महेश्वरा...
गुरुः साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः...
ध्यानम् मूलंम गुरुर मूर्ति, पूजा मूलंम गुरु पदम्
मन्त्र मूलंम गुरुर वाक्यं मोक्ष मूलंम गुरु कृपा
मंत्र सत्यम पूजा सत्यम, सत्यम देव निरंजनम 
श्री गुरु वाक्यम सदा सत्यम, एकम् परम पदम 
या देहाच्या मंदीरी नांदतो विश्वरुपी आत्मा 
त्या त्या देहाची गुरुकिल्ली 
ती विश्वज्योती.. साठी 
ऐसे जीवन ते सर्वची 
गुरूच्या कृपेने सद्गुरू साठी 
अवघे दिसे ते नाम 
त्याहूनी गुरुचरण सेवा..काम 
धन्य ते विश्वासाठी सावली 
ती गुरूकृपा..माऊली 
हे सांगूनी आदिनाथ 
बोलती..माऊलीनाथ
गुरू हेची महायोगी गुरूपीरजी शिवनाथजी 
प्रचंड शक्ती अमाप भक्तीचा तोची अवतार
कल्पतरू जीवनाचा सार,हेच माझे गुरू थोर 
महायोगी गुरुपीरजी,शिवनाथजी महाराजकी जय
गंगेहर,जटाशंकरीहर,नमो पार्वतीपती 
बोला श्री शंभूरती 
गुरू गोरक्षनाथ महाराजकी जय 
मायादरूपी दादागुरू 
मच्छिंद्रनाथ महाराजकी जय 
नवनाथ महाराजकी जय 
चौर्याऐंशी सिध्दनाथकी जय 
आदेश~आदेश~आदेश~आदेश~आदेश
कोण देशाचा आलाय हा योगी 
अलख निरंजन म्हणतोय हो 
अलख निरंजन म्हणतोय हो 
हे, आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश.... 
🌹🙏🌹
पहीले नमन त्या गजाननासी
पहीले नमन त्या गजाननासी
वक्रतुंड त्या गजाननासी
सिध्दविनायक महानायकासी
डमरूवाजे ढोलक वाजे 
तबला वाजे ढोलकी वाजे... 
माऊलीनाथाची वाणी गाजे 
गोरक्षाची वाणी गाजे 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश...
🙏🌹🙏
आदीनाथाचा मुख्य शिष्य 
आदीनाथाचा मुख्य शिष्य 
बाबा आमुचे मच्छिंद्रनाथ 
मच्छिंद्रांचा मुख्य शिष्य... 
हेची माझे गोरक्षनाथ 
गोरक्षाने गहीनी केला 
मातीचा पुतळा जीवंत केला 
त्रिलोकी श्रेष्ठ ठरला 
म्हणतात यांना गोरक्ष 
म्हणतात यांना गोरक्ष 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश
स्त्री राज्यासी गोरख गेला 
स्त्री राज्यासी गोरख गेला 
गुरुला त्याने सोडवून आणले 
डफावरती थाप वाजली 
ढोलकी मधूनी आवाज काढला 
तबल्या मधूनी बोल काढले 
डमरुमधूनी आवाज काढला 
चलो मच्छिंदर गोरख 
चलो मच्छिंदर गोरख 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश 
आदेश बोलो बाबा आदेश
🙏 जय आदेश जय गोरक्ष 🙏



गणेश वंदना (गणगवळण)

🙏गणगवळण(श्रीगणेश वंदना)🙏
🌷स्वर- विठ्ठल शिंदे, विष्णू वाघमारे 🌷
🙏 सौजन्य- रविंद्र झांबरे 🙏
लवकर यावे सिद्ध गणेशा 
लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा 
( लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा)
माझा भरवसा तुम्हावरी खासा 
माझा भरवसा तुम्हावरी खासा 
वैरी पळविला दाही दिशा...
वैरी पळविला दाही दिशा...
लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा
(   लवकर यावे सिद्ध गणेशा 
आतमध्ये किर्तन वरुनी तमाशा)
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
पहीलं पाऊल पहिला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 

देवादीकानो हे रसिकानो
आशीर्वाद द्या तुमचा हो 
देवादीकानो, हे रसिकानो...
(कोरस)
तालावरती सुर लागता 
खेळ रंगला आमचा हो 
पहीलं पाऊल पहिला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती 
(कोरस)
येती अप्सरा करीती नखरा 
कवन सागरा ये भरती 
सुदबुद हरली तहानभूक सरली 
नाचू लागली मदनरती 
पहीलं पाऊल पहीला मुजरा 
सादर करीतो कलाकृती 
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती
मंडप फुलला मेळा जमला 
गणराया झाला सभापती
🙏 धन्यवाद मंडळी 🙏