Saturday, 31 July 2021

शपथ या बोटांची

🌹 चित्रपट-लक्ष्मण रेषा 🌹
शपथ या बोटांची... 
शपथ या ओठांची... 
तुझी मी जोडीदार...
शपथ या बोटांची
🌷स्वर-आशा भोसले🌷
शपथ वनाची रे..शपथ मनाची रे 
शपथ वनाची, शपथ मनाची, 
आकाशाची, दिशांगनाची
शपथ धरतीची रे..
शपथ नवतीची रे..
तुझी मी जोडीदार..
शपथ या बोटांची
आहाहाहाहा.. हां हां हां 
आहाहाहाहा.. हां हां हां
हां हां हां..हां..
        🎵
शपथ खगांची रे..शपथ नगांची रे 
शपथ खगांची,शपथ नगांची
प्रीत भारल्या उभ्या जगाची 
शपथ..शपथ..
शपथ या वाऱ्याची...
नभातील ताऱ्यांची...
तुझी मी जोडीदार...
शपथ या बोटांची
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
शपथ जलाची रे..शपथ कुळाची रे..
शपथ जलाची,शपथ कुळाची
तरू लतिकांची फुलाफुलांची 
शपथ या श्वासांची...
सुगंधित वासाची...
तुझी मी जोडीदार...
शपथ या बोटांची
आहाहाहाहा.. हां हां हां 
आहाहाहाहा.. हां हां हां 
हो.. होहोहो..हो 
        🎵
शपथ आजची रे..शपथ उद्याची रे..
शपथ आजची,शपथ उद्याची
सागरवेड्या सर्व नद्यांची 
शपथ रे प्रीतीची..
शपथ रे नीतीची..
तुझी मी जोडीदार...
तुझी मी जोडीदार..
तुझी मी जोडीदार..
🙏 धन्यवाद 🙏

ऐका सत्यनारायणाची कथा

🌹रचना-अनंत पाटील🌹
🌷स्वर-प्रल्हाद शिंदे🌷 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏 
श्रीहरी जगद्पिता
दूर करी तो व्यथा
ऐका सत्यनारायणाची कथा
(ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा)
उल्का मूक राजा होता महाथोर
तयाची पत्नी होती सुंदर
नदी किनारी एकदा त्यांनी
घातली महा पूजा दोघांनी
आली एक नौका त्याच मार्गानी
नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी
होती व्यापारी साधु वाण्याची
रीत पाहण्यास आला पूजनाची
उल्का मूक त्यास बोले ऐकावे
व्रत नारायणाचे अचरावे
मनो इच्छित फल मागावे
चरणी श्रीहरी च्या लागावे
घराशी आला वाणी परतून
तयाची पत्नी होती शीलवान
तयास नव्हते काही संतान
केला नवस म्हणून वाण्यान
पति पत्नीला जाहली जाण
कन्या ही झाली त्यास रूपवान
कलावती म्हणून कन्येचे
नाव ठेविले त्याने आवडीचे......
योगियांची ही प्रथा
जाई ना कधी वृथा
जाई ना कधी वृथा
(ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा)
लीलावती ने काही दिवासांन
दिली नवसाची त्यास आठवण
बोल पत्नीचे ऐसे ऐकून
दिले उत्तर साधु वाण्यान
लग्न कन्येचे होता मानान
करिन पूजा मोठ्या थाटान
दूत कांचन नगरी धाड़ीला
वर एक वैश्य पुत्र ठरविला
केले हो कन्यादान बापांन
विवाह पार पड़ला थाटान
व्रत नवसाचे गेला विसरुन
म्हणून वृष्ट झाले भगवान
जावया सह आला तो वाणी
करण्या धंदा आपला मानानी
नगर ते होते चंद्रकेतुचे
इथेच ग्रह फिरले दोघांचे
चंद्र केतूच्या महालातून
चोराने द्रव्य नेले चोरुन
राज दुताने पाहिली चोरी
आला तो चोर वाण्याच्या दारी
चोरीचे द्रव्य तेथे टाकून
पळाला चोर दूत पाहुन
साधू वाण्यावरी आला आळ
केले दोघांसी कैद तात्काळ.....
कर्ता आणि करविता
काय घडवितो आता
काय घडवितो आता
(ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा)
लीलावतीस दुःख बहु झाले
घरी ही द्रव्य चोरीस गेले
लागल्या मागु दोघी ही भिक्षा
पूजा न केल्याचीच ही शिक्षा
होते ब्राम्हणा घरी पूजन
आली कलावती ते पाहून
घरी सांगून तिने मातेला
घातली पूजा त्याच वेळेला
चंद्र केतूच्या तेव्हा स्वप्नात
देव जाऊन देती दृष्टांत
दोघे निर्दोष असती व्यापारी
सोडुनी द्यावे त्यांना सत्वरी
सूटता कैदेतून तो वाणी
निघे भरून नौका द्रव्यानी
जाहली इच्छा तोच देवाची
परीक्षा घेण्या साधू वाण्याची
येऊ नी त्यास म्हणती भगवंत
ठेविले काय आहे नौकेत
म्हणे तो नौका माझी तरलेली
वेली व पाणी याने भरलेली
होवो खरे तुझे ते बोलून
यति ते दूर बसले जाऊन
द्रव्य गेले व पाने पाहिली
क्षमा यतिची त्याने मागितली
वेली पानाचे द्रव्य बनवून
दिले यतिने त्यास परतून
बांधवा संगे साधू वाण्यांन
केले नारायणाचे पूजन.....
ठेव हृदयी सत्यता
श्रीहरीशी पूजिता
श्रीहरीशी पूजिता
(ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा)
आला तो वाणी आपुल्या नगरात
जावई राहिला तो नौकेत
बातमी ऐकूनी आनंदाची
हर्षली भार्या साधु वाण्याची
गेली लीलावती ती चटकन
पतिचे घ्यावयास दर्शन
घरी कलावतीने भक्तीन
केले नारायणाचे पूजन
नाही केला प्रसाद भक्षण
तशीच गेली घेण्या दर्शन
म्हणूनी वृष्ट झाले भगवान
दिली नौका नदीत बुडवून
आकाशवाणी ती पड़े कानी
आली कन्या प्रसाद त्यागुनी
तीचा पति मिळेल परतुनि
जर येईल प्रसाद भक्षुनी
घरी कलावतीने जाऊन
आली त्वरे प्रसाद भक्षुन
पति सह नौका पडली दृष्टीस
घातली पूजा हर्ष सर्वास.....
श्री प्रसाद भक्षिता
लाभे सौख्य सर्वथा
लाभे सौख्य सर्वथा
(ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा
ही ऐका सत्यनारायणाची कथा)
🙏 🌹जय श्रीहरी 🌹🙏

बाई माझ्या पायाला बांधलाय

💃🌹लावणी🌹💃
भिरर्रर्रर्र...
🙏स्वर-आशा भोसले सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
गुलजार,गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा...
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा 
भिरर्रर्रर्र

सडसडीत सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी...
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी भिरिभिरी भिरिभिरी शोधते कुणा...
भिरिभिरी भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी.. चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा...
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा 
भिरर्रर्रर्र


डाळिंब फुटे ओठांत...
डाळिंब फुटे ओठांत,गालांमध्ये लाज,होहोहो
मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज
जपून घेते अंदाज,
होहोहो होहोहो 
छुम छनन..छुमछुम बोले चाळ नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा
बाई माझ्या अं... 
💃💃💃💃💃💃💃
बेभान नाचते,रूपगुणाची राणी
ऊर होतो खालीवर बाई
ऊर होतो खालीवर बाई पारव्यावा~णी
अडवुनी..अडवुनी जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा...
गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा...
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
 भिरर्रर्रर्र
🙏 धन्यवाद 🙏

नित्य वाचे प्रभूनाम

🌷स्वर-स्वप्नील बांदोडकर🌷
🙏 सौजन्य रविंद्र झांबरे 🙏
नित्य वा..चे प्रभुनाम गाऊ
प्रभुनाम गाऊ,प्रभुनाम गाऊ
🙏🌹🙏🌹🙏🌹
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ हो 
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू हो
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
नित्य वाचे प्रभुनाम गा..ऊ
पांडुरंगी सदा लीन राहू हो 
नित्य वाचे प्रभुनाम गा..ऊ
🎵🎵🎵🎵🎵🎵
हा फेर जनन मरणाचा हो 
हा फेर जनन मरणाचा
हा फेर जनन मरणाचा
आ.. आआआ..आआआ
हा फेर जनन मरणाचा
चुकविताही ना चुकण्याचा हो 
चुकविताही ना चुकण्याचा
आआआ,चुकविताही ना चुकण्याचा
चुकविताही ना चुकण्याचा
चुकविताही ना चुकण्याचा
सुखेदु:खे समानची साहू हो 
सुखेदु:खे समानची साहू
पांडुरंगी सदा लीन राहू हो
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
कोणी ब्रा..ह्मण,कोणी महार
कोणी ब्रा..ह्मण,कोणी महार
करू नका असा अविचा~र
करू नका असा अविचा~र
करू नका असा अविचा~र
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ हो
एकमेकां म्हणू भाऊ-भाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू हो 
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
🎵🎵🎵🎵🎵🎵
सुख दा~रा घर सन्मान हो
सुख दा~रा घर सन्मान
नको वृथाच हा अभिमान हो 
नको वृथाच हा अभिमान
आआ, नको वृथाच हा अभिमान
नको वृथाच हा अभिमान
नको वृथाच हा अभिमान
प्रभु पायी तनू-ध्यान वाहू हो 
प्रभु पायी तनू-ध्यान वाहू
पांडुरंगी सदा लीन राहू हो 
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ हो
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
पांडुरंगी सदा लीन राहू हो
नित्य वाचे प्रभुनाम गाऊ
नित्य वाचे प्रभुनाम गा..ऊ
🙏 धन्यवाद 🙏

Monday, 21 June 2021

संत भार पंढरीत

आ आ आ ...
संतभा..र पंढरींत,संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभार पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गजर होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ, 
संतभा..र पंढरींत
🌷स्वर-आसावरी बोधनकर🌷
तेथ असे.. देव उभा,तेथ असे..देव उभा
तेथ असे..देव उभा,तैसी समचरणां..ची शोभा
तैसी समचरणां..ची शोभा,
तैसी समचरणां..ची शोभा,चरणां..ची शोभा,
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
रंग भरे..कीर्तनांत,रंग भरे..कीर्तनांत
प्रेमें हरिदास नाचत,प्रेमें हरिदास नाचत 
हरिदा..स नाचत अ
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गजर होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ
🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
सखा..विरळा..ज्ञानेश्वर 
सखा..विरळा..ज्ञानेश्वर अ अ अ 
सखा विरळा ज्ञानेश्वर
नामया..चा जो जिव्हार,
नामया..चा जो जिव्हार 
नामया...चा आआआ आआआ आआआ 
नामया..चा जो जिव्हार,
नामया..चा जो जिव्हार
जो......जिव्हार
संतभा..र पंढरींत,
संतभा..र पंढरींत अ अ अ
संतभा..र पंढरींत,कीर्तना..चा गजर होत 
कीर्तना..चा गज..र होत,संतभा..र पंढरींत
संतभा..र पंढरींत अअअ
संतभा..र पंढरींत
पंढरींत
पंढरीं...त
🙏 श्रीहरी 🙏

आई माझी कोणाला पावली

🌷भक्तीपुर्ण कोळीगीत🌷
🙏आई माझी कोणाला पावली🙏
🌹 स्वर-शाहीर साबळे 🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आई माझी कोणाला पावली गो 
आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
आई माझी एकोरी एकोरी गो 
आई माझी एकोरी एकोरी
आई माझी एकोरी एकोरी गो,एकोरी एकोरी
आई माझी एकोरी एकोरी गो,एकोरी एकोरी
आई तुझी लोनावल्याची वाट गो
आई तुझी लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट,गो लोनावल्याची वाट
आई तुझी लोनावल्याची वाट,गो लोनावल्याची वाट

आई तुझं मलवली ठेसन गो 
आई तुझं मलवली ठेसन
आई तुझं मलवली ठेसन गो,मलवली ठेसन
आई तुझं मलवली ठेसन गो,मलवली ठेसन

आई तुझा गुल्लालु डोंगर गो 
आई तुझा गुल्लालु डोंगर
आई तुझा गुल्लालु डोंगर गो,गुल्लालु डोंगर
आई तुझा गुल्लालु डोंगर गो,गुल्लालु डोंगर

आई तुझा डोंगर कुणी बांधिला गो 
आई तुझा डोंगर कुणी बांधिला
बांधिला पाच पांडवांनी गो,भीमा बांधवांनी
बांधिला पाच पांडवांनी गो,भीम बांधवांनी

आई तुझं देऊळ कुणी बांधिलं गो 
आई तुझं देऊळ कुणी बांधिलं
बांधिलं पाच पांडवांनी गो,अर्जुन बांधवांनी
बांधिलं पाच पांडवांनी गो,अर्जुन बांधवांनी

आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
आई माझी कोंबर्‍यावर बैसली
आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
कोंबर्‍यावर बैसली
आई माझी कोंबर्‍यावर बैसली गो 
कोंबर्‍यावर बैसली

आई तुला नवस काय काय बोलु गो 
आई तुला नवस काय काय बोलु
आई तुला नवस काय काय बोलु गो 
नवस काय काय बोलु
आई तुला नवस काय काय बोलु गो 
नवस काय काय बोलु
आई माझी कोणाला पावली गो 
आई माझी कोणाला पावली
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
पावली कोली लोकायाला गो,आगरी लोकायाला
🙏 धन्यवाद 🙏

चांदण्यान चांदणं पीठभर

चांदनेन चांदनं पीठभर चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा
गो बाई चांदुन्या घातिल्या बाजा
चांदनेन चांदनं पीठभर चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा
गो बाई चांदुन्या घातिल्या बाजा
या बाजेवर कोन देव निजे गो किस्‍न देव निजे
गो राधाबाय घालिते वारा 
गो बाय राधाबाय घालिते वारा
या बाजेवर कोन देव निजे गो किस्‍न देव निजे
गो राधाबाय घालिते वारा 
गो बाय राधाबाय घालिते वारा
राधाबायचे वटीनं काय गो 
किस्‍नाच्या गवलनी बारा
गो बाई किस्‍नाच्या गवलनी बारा
राधाबायचे वटीनं काय गो 
किस्‍नाच्या गवलनी बारा
गो बाई किस्‍नाच्या गवलनी बारा..
💃🕺💃🌹💃🕺💃
किस्‍नाच्या गवलनी बारा 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या
किस्‍नाच्या गवलनी बारा 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या
मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय फुलांचा करूंडा केला
गो बाय फुलांचा करूंडा केला
मालंनी मल्ल्यान्‌ गेल्या 
गो बाय फुलांचा करूंडा केला
गो बाय फुलांचा करूंडा केला
फुलांचा करूंडा केला 
गो बाय हौलूचे पूजेला नेला
गो बाय हौलूचे पूजेला नेला..
💃🕺💃🌹💃🕺💃
हौलूबाय, हौलूबाय, तुजे शराचं नांव काय?
तुजे शराचं नांव काय?
शाराचं नांव मुंबै शार, तुजे गांवाचं नांव काय?
तुजे गांवाचं नांव काय?
गांवाचं नांव वरली गांव, 
तुजे पाटलाचं नांव काय?
तुजे पाटलाचं नांव काय?
पाटलाचं नांव शंकर पाटील, 
तुला ग दोधन्‌ काय
तुला ग दोधन्‌ काय
तुला गो दोधन्‌ हंडे पंडे, 
पालखीन्‌ बैसुन जाय
आगं पालखीन्‌ बैसुन जाय
पालख्या मोरा सतरा जोरा 
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
मी जातंय आजाचे घरा
🌷स्वर-बालकराम वरलीकर🌷
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏