Saturday, 19 June 2021

फू बाई फू

          🕺मराठी लोकगीत💃
           🌹शाहीर विठ्ठल उमप 🌹
           🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏 
फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू 
फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू 
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃🕺

आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबार्‍याचा वेळू
आत पोकळ, बाहेर पोकळ डोंबार्‍याचा वेळू
म्हातारपणी नवरा केला तोही पोरखेळू
आता फुगडी फू
फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃🕺

माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी
माय-लेकी गोष्टी सांगे त्यांची प्रीत मोठी
लुगडं सोडून जेऊ लागली जावयाच्या ताटी 
आता फुगडी फू
फू बाई फू, फुगडी फू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃🕺

नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं
नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाजं
आता झाली चिली-पिल्ली कोंबडीवाणी झुंजं
आता फुगडी फू
फू बाई फू, फुगडी फू 
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃

काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दावी लोका
काजळ ल्याली, कुंकु ल्याली, टिकली दावी लोका
देवाजीचा संग नाही रंग झाला फिका
आता फुगडी फू
फू बाई फू, फुगडी फू 
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
   🚩धन्य आमुची मायबोली🚩

संतांची निंदा केली, निंदा नाही बरी
संतांची निंदा केली, निंदा नाही बरी
तुकाराम शरण गेले सद्गुरू पायी
आता फुगडी फू
फू बाई फू, फुगडी फू 
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
फू बाई फू, फुगडी फू 
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
दमलास काय माझ्या गोविंदा तू रं गोविंदा तू
धन्यवाद 🙏

हुरहूर असते तीच उरी

आ आ आ ...
आ आ आ ...
आ आ आ ...
हुरहुर असते..तिच उरी 
हुरहुर असते..तिच उरी 

दिवस बरा... की रात्र बरी 
हुरहुर असते..तिच उरी 
हुरहुर असते..तिच उरी 
*स्वर-शुभा जोशी*

कुठला.. रस्ता सां..ग खरा
कुठला.. रस्ता सां..ग खरा..
वळणाचा..की सरळ बरा..
कुठला.. रस्ता सां..ग खरा..

वळणाचा..की सरळ बरा..
वळणाचा..की सरळ बरा..
हुरहुर असते तिच उरी 
हुरहुर असते तिच..उरी 
*चित्रपट-एक उनाड दिवस*

जगणे..मरणे..काय बरे 
सुख खरे..की दु:ख खरे
जगणे..मरणे..काय बरे 
सुख खरे की दु:ख खरे
सुख खरे..की दु:ख खरे

हुरहुर असते..तिच उरी 
हुरहुर असते..तिच उरी 
दिवस बरा... की रात्र बरी 
हुरहुर असते..तिच उरी 
हुरहुर असते..तिच..उरी 
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
धन्यवाद 🙏




हे मना आज कोणी

     🌹भावगीत🌹
हे मना..आज कोणी बघ तुला 
साद घाली
हे मना,आज कोणी बघ तुला 
साद घाली

जाण रे..दाटलेली ही किमया,
भोवताली
हे मना..
*स्वर-मोहम्मद रफी*

हा वारा तान घे..ई,
निर्झरही साथ दे..ई
हा वारा तान घे..ई,
निर्झरही साथ दे..ई

गुणगुणती दिशा दा..ही,
घे जाणून मूक बो..ली
घे जाणून मूक बोली..
हे मना,आज कोणी बघ तुला साद घाली
हे मना..

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वेद गाती,रम्य ला..टा,
फूल फुलवी,गंधगाथा
वेद गाती,रम्य ला..टा,
फूल फुलवी,गंधगाथा

किरण होउन रे विधा..ता,
लोपवितो रात्र काळी
लोपवितो रात्र काळी..
हे मना,आज कोणी बघ तुला साद घाली
हे मना..

   ❤भावगीत❤
शोधिसी तू,सौख्य कोठे 
जीवनाशी,जोड नाते
शोधिसी तू,सौख्य कोठे 
जीवनाशी,जोड नाते

साठला रे,स्वर्ग येथे
राहिली का,रिक्त झोळी
राहिली का..रिक्त झोळी
हे मना,आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली ही किमया भोवताली
हे मना..
धन्यवाद 🙏

ज्ञानदेव बाळ माझा

🌹गीत-पी.सावळाराम🌹 
ज्ञानदेव बाळ माझा.. 
सांगे गीता भगवंता..
ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता
ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता

लक्ष द्या हो विनवीते, 
मराठी मी त्याची माता 
ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता
*स्वर-आशा भोसले*

गोड माझ्या सोनुल्याचा, 
लळा लागे बा..लपणा..
गोड माझ्या सोनुल्याचा, 
लळा लागे बा..लपणा
बांधुनीया घुंगुरवाळे, 
अंगी नाचे थो..रपणा

निरुपण सांगायाला...
निरुपण सांगायाला
तुम्ही द्या हो शहाणपणा
बाळमुखी मोठा घास, 
भरवा हो जगन्नाथा 
ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता
*सौजन्य-रविंद्र झांबरे*

निरक्षर लोकांसाठी, 
प्राणांचेहि देउन मोल
निरक्षर लोकांसाठी, 
प्राणांचेहि देउन मोल
अमृताते जिंकुन पैजा, 
धांवे मराठाची बोल

ज्ञानदीप डोळिंयांचे...
ज्ञानदीप डोळिंयांचे
तेजाळतां तेजोगोल
देवगुरु खाली आले, 
जोडोनिया दोन्ही हाता 

ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता
लक्ष द्या हो विनवीते, 
मराठी मी त्याची माता 
ज्ञानदेव बाळ माझा, 
सांगे गीता भगवंता
धन्यवाद 🙏

आला पाऊस मातीच्या वासात ग

⚡🌧पाऊस गाणे🌧⚡
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ 
आला पाऊस
*स्वर-पुष्पा पागधरे*
आभाळा..त आले..काळेकाळे ढग
आभाळा..त आले..काळेकाळे ढग
धारा, कोसळल्या.. निवे तगमग
धारा, कोसळल्या.. निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या, श्वासांत ग.. 
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या,वासात ग अ
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ 
आला पाऊस
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
कोसळल्या कशा सरीवर सरी...
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी...
कोसळल्या कशा सरीवर सरी...
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी...
लाल ओहळ,लाल ओहळ,वाहती जोसात ग 
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग अ
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ 
आला पाऊस 
⚡⚡🌧🌧⚡⚡🌧🌧⚡⚡
वीज कडाडता.. भय दाटे, उरी..
एकली मी इथे..एकली मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकुळ,मन व्याकुळ, सजणाच्या,ध्यासात ग.. 
आला पाऊस,आला पाऊस,मातीच्या वासात ग अ 
मोती गुंफीत,मोती गुंफीत,मोकळ्या केसांत ग अ अ 
आला पाऊस,आला पाऊस
धन्यवाद 🙏

टपटप टपटप काय बाहेर वाजतंय

⚡🌧पाऊस गाणे🌧⚡
🌷स्वर आशा भोसले🌷
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
टप टप टप..
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ
चल गं आई,
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
आकाशी,गडगडते,म्हातारी का दळते
आकाशी,गडगडते,म्हातारी का दळते
गडड गुडुम गडड गुडुम,ऐकत गे राहू
गडड गुडुम गडड गुडुम,ऐकत गे राहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
या गारा कश्या कश्या,आल्या सटासटा
या गारा कश्या कश्या,आल्या सटासटा
पट पट पट,वेचूनिया
पट पट पट,वेचूनिया, ओंजळीत घेऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
फेर गुंगुनी धरू,भोवर्‍यापरी फिरू
फेर गुंगुनी धरू,भोवर्‍यापरी फिरू
ये पावसा घे पैसा,ये पावसा घे पैसा
गीत गोड गाऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
पहा फुले,लता तरू,चिमणी गाय वासरू
पहा फुले,लता तरू,चिमणी गाय वासरू
चिंब भिजती,मीच तरी,का घरात राहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ
टप टप टप 
धन्यवाद 🙏

Wednesday, 16 June 2021

पाहुनी रघुनंदन सावळा

🌹श्रीराम-सिता स्वयंवर🌹
पाहुनी रघुनंदन सावळा
पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
🌷स्वर-लता मंगेशकर🌷
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी...
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
उभी जा..नकी जनकाजवळी
घेउनी धवल फुलांची माला
पाहुनी रघुनंदन सावळा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काहि सुचेना
काय करा..वे काहि सुचेना
न्याहळी दुरुनी श्रीरामाला
पाहुनी रघुनंदन सावळा
🎵🎵🎵🎵🎵🎵
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी...
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
मनासा..रखे येता जुळुनी
नाचते हर्षभराने मिथिला
पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
पाहुनी रघुनंदन सावळा
🙏 धन्यवाद 🙏