Saturday, 19 June 2021

टपटप टपटप काय बाहेर वाजतंय

⚡🌧पाऊस गाणे🌧⚡
🌷स्वर आशा भोसले🌷
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
टप टप टप..
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
भिरभिर भिरभिर अंगणात बघ वारे नाचतात
गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ
चल गं आई,
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
आकाशी,गडगडते,म्हातारी का दळते
आकाशी,गडगडते,म्हातारी का दळते
गडड गुडुम गडड गुडुम,ऐकत गे राहू
गडड गुडुम गडड गुडुम,ऐकत गे राहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
या गारा कश्या कश्या,आल्या सटासटा
या गारा कश्या कश्या,आल्या सटासटा
पट पट पट,वेचूनिया
पट पट पट,वेचूनिया, ओंजळीत घेऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
फेर गुंगुनी धरू,भोवर्‍यापरी फिरू
फेर गुंगुनी धरू,भोवर्‍यापरी फिरू
ये पावसा घे पैसा,ये पावसा घे पैसा
गीत गोड गाऊ
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
💃🕺💃🕺💃🕺💃🕺💃
पहा फुले,लता तरू,चिमणी गाय वासरू
पहा फुले,लता तरू,चिमणी गाय वासरू
चिंब भिजती,मीच तरी,का घरात राहू
टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल गं आई, चल गं आई पावसात जाऊ
टप टप टप 
धन्यवाद 🙏

Wednesday, 16 June 2021

पाहुनी रघुनंदन सावळा

🌹श्रीराम-सिता स्वयंवर🌹
पाहुनी रघुनंदन सावळा
पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
🌷स्वर-लता मंगेशकर🌷
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी...
नक्षीदार अति रम्य मंडपी
जमली सारी थोर मंडळी
उभी जानकी जनकाजवळी
उभी जा..नकी जनकाजवळी
घेउनी धवल फुलांची माला
पाहुनी रघुनंदन सावळा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
धनुष्यास त्या दोर लावण्या
शूर पुरुष तो कुणी धजेना
काय करावे काहि सुचेना
काय करा..वे काहि सुचेना
न्याहळी दुरुनी श्रीरामाला
पाहुनी रघुनंदन सावळा
🎵🎵🎵🎵🎵🎵
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी...
मुनीवरांना मान देउनी
उठले रघुवीर असे पाहुनी
मनासारखे येता जुळुनी
मनासा..रखे येता जुळुनी
नाचते हर्षभराने मिथिला
पाहुनी रघुनंदन सावळा
लाजली सीता स्वयंवराला
लाजली सीता स्वयंवराला
पाहुनी रघुनंदन सावळा
पाहुनी रघुनंदन सावळा
🙏 धन्यवाद 🙏

भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली

तो-भन्‍नाट रानवारा...
भन्‍नाट रानवारा 
मस्तीत शीळ घाली,मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
ती-भन्‍नाट रानवारा...
भन्‍नाट रानवारा 
मस्तीत शीळ घाली,मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
दोघे-भन्‍नाट रानवारा...
*सुरेश वाडकर,उत्तरा केळकर*
तो-येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
ती-पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
तो-पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ...
मनीची खूणगाठ  लगीन गाठ झाली
ती-लगीन गाठ झाली
दोघे-रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
भन्‍नाट रानवारा...
*चित्रपट-कशासाठी प्रेमासाठी*
ती-रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
तो-हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
ती-हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं...
बाशिंग डहाळीचं वेलींच्या मुंडावळी
तो-वेलींच्या मुंडावळी
दोघे-रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
भन्‍नाट रानवारा...
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
तो-पानांची गच्च जाळी,काळोख दाट झाला
ती-काळोख गंधाळला,काळोख तेजाळला
पानांची गच्च जाळी,काळोख दाट झाला
तो-काळोख गंधाळला,काळोख तेजाळला
दोघे-झुलती काळोखात...
झुलती काळोखात,गाण्याच्या दोन ओळी
गाण्याच्या दोन ओळी
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
भन्‍नाट रानवारा
मस्तीत शीळ घाली,मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली
तो-भन्‍नाट रानवारा,
ती-भन्‍नाट रानवारा
तो-भन्‍नाट रानवारा,
ती-भन्‍नाट रानवारा
तो-भन्‍नाट रानवारा,
ती-भन्‍नाट रानवारा

झन झनननन छेडील्या तारा

*स्वर-सुरेश वाडकर*
आआआ..आआआ..आआआ..
झन झननन छेडिल्या तारा
झन झननन छेडिल्या ता..रा
झन झननन छेडिल्या तारा

पदी नूपुर बोलती ततकारा
पदी नूपुर बोलती ततकारा
झन झननन छेडिल्या तारा
झन झननन छेडिल्या तारा
*चित्रपट-हळदी कुंकू*

मदन मेनका मस्त मयूरी
आ आ  आ आ  आ आ..
मदन मेनका मस्त मयूरी
आरसपा..नी रूप बिलोरी
आरसपा..नी रूप बिलोरी

नर्तना..तुनी आवर्तन हे 
नर्तना..तुनी आवर्तन हे 
उधळी रंग पिसारा..
झन झननन छेडिल्या ता..रा
झन झननन छेडिल्या तारा
*सौजन्य रविंद्र झांबरे*

यौवनातल्या वनी उर्वशी
आ आ  आ आ  आ आ.. 
यौवनातल्या वनी उर्वशी
प्रणय खेळते रे..शीम स्पर्शी
प्रणय खेळते रे..शीम स्पर्शी

लहरी..मधुनी बहर येऊ दे 
लहरी..मधुनी बहर येऊ दे
आतुरल्या शृंगारा..
झन झननन छेडिल्या तारा
झन झननन छेडिल्या तारा
💃🕺💃🕺💃🕺💃
सूर-ताल जणू संगम झाला
आ आ  आ आ  आ आ..
सूर-ताल जणू संगम झाला
शब्द सुगंधी मधा..त न्हाला
शब्द सुगंधी मधा..त न्हाला

मुके हो..उनी धुके मुला..यम 
मुके हो..उनी धुके मुला..यम 
बरसत अमृतधारा..
झन झननन छेडिल्या तारा
झन झननन छेडिल्या ता..रा
झननन छेडिल्या तारा
धन्यवाद 🙏

ही नटरंगी नार

🌷लावणी लावण्यवती🌷
🌹शाहीर पठ्ठे बापूराव🌹
ही नटरंगी नार, मारी काळजात वार
ही नटरंगी नार, मारी काळजात वार
पाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी
पाडी कासोट्याला पार, चापुनिया पट्टी

पाटलाला दावला चाळा, 
कुलकर्ण्याला घालती डोळा...
अहो, पाटलाला दावला चाळा, 
कुलकर्ण्याला घालती डोळा

मास्तरांनी सोडली शाळा हिच्यासाठी
मास्तरांनी सोडली शाळा हिच्यासाठी
ही नटरंगी ना..र
*स्वर-रविंद्र साठे*

तेल्यापासून तेल बघा नेती, 
वाण्यापासून गूळ ही घेती
तेल्यापासून तेल बघा नेती, 
वाण्यापासून गूळ ही घेती

हिनं गुजराला येडा केला
हिनं गुजराला येडा केला
खुळा झालाया बामण, 
सोडून दिलं देवध्यान...
खुळा झालाया बामण, 
सोडून दिलं देवध्यान

मागं पंचांग घेऊन पळतोया किती
मागं पंचांग घेऊन पळतोया किती
ही नटरंगी ना..र
*सौजन्य-रविंद्र झांबरे*

हिचा पाहुनिया ताल, 
फुगले सोनाराचे गाल लाल
हिचा पाहुनिया ताल, 
फुगले सोनाराचे गाल 

त्यानं दुसर्‍याचा माल हिला दिला
त्यानं दुसर्‍याचा माल हिला दिला
लावलं तांबटाला पिसं, 
केलं बुरडाचं हसं...
लावलं तांबटाला पिसं, 
केलं बुरडाचं हसं

परटाचा पाडला किसं , आता सांगू किती
परटाचा पाडला किसं , आता सांगू किती
ही नटरंगी ना..र
💃💃💃💃💃💃💃💃💃

हिचा कळला नाही कावा, 
सोडला कुंभारानं आवा
अहो, हिचा कळला नाही कावा, 
सोडला कुंभारानं आवा
गुरवाला दावली बघा हवा
गुरवाला दावली बघा हवा

अशी बाजिंदी नार, 
हिचं दिसणं गुलजार...
अशी बाजिंदी नार, 
हिचं दिसणं गुलजार
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा

म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा
म्हणे पठ्ठे बापू पार छंद सोडा हिचा
🌷मायबोलीची आस धरा🌷
धन्यवाद 🙏

प्रेम स्वरूप आई

प्रेमस्वरूप आ..ई वात्सल्यसिंधु आ..ई 
बोलावुं तूज आ..ता मी कोणत्या उपायीं
आआआ, प्रेमस्वरूप आ..ई
*स्वर-लता मंगेशकर*
नाहीं जगांत झाली ,आबाळ या जिवाची..
नाहीं जगांत झाली ,आबाळ या जिवाची..
तूझी उणी..व चित्तीं आई..तरीहि जाची..
चित्तीं तुझी स्मरेना.. कांहींच रूपरे..खा,
आई हवी म्हणू..नी.. सोडी न जीव हे..का 
प्रेमस्वरूप आ..ई
*कवि-माधव ज्युलियन*
ही भूक पोरक्याची..होई न शांत आ..ई,
पाहूनियां दुज्यां..चें वात्सल्य लोचनांहीं.. 
वाटे इथून जावें..तूझ्यापुढें निजा..वें,
नेत्रीं तुझ्या हसा..वें..चित्तीं तुझ्या ठसावें..
प्रेमस्वरूप आ..ई
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वक्षीं तुझ्या परि हें,केव्हां स्थिरेल डोकें..
वक्षीं तुझ्या परि हें,केव्हां स्थिरेल डोकें..
देईल शां..तवाया हृत्स्पं..द मंद झोके.. 
घे जन्म तूं फिरूनी..येईन मीहि पो..टीं,
खोटी ठरो न दे..वा.. ही एक आस मो..ठी 
प्रेमस्वरूप आ..ई,आ..ई....
धन्यवाद 🙏

राधा गौळण करिते मंथन

राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
*स्वर-आशा भोसले*

सुवर्ण चंपक यौवनकांती 
हिंदोळत ती मागे पुढती 
सुवर्ण चंपक यौवनकांती 
हिंदोळत ती मागे पुढती 

उजव्या डाव्या झुलत्या हाती 
उजव्या डाव्या झुलत्या हाती 
कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
नाद मुरलीचा पडता कानी 
नाद मुरलीचा पडता कानी 
बावरली ती गोकुळ हरिणी 
गोकुळ हरिणी 
नाद मुरलीचा पडता कानी 
बावरली ती गोकुळ हरिणी 

छुमछुम छंदी घुंगुर चरणी 
छुमछुम छंदी घुंगुर चरणी 
गुण गोविंदी गेली रंगून 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 

💃💃💃💃💃💃
राधेविण ते मंथन चाले 
नवल बघाया नवनीत आले 
राधेविण ते मंथन चाले 
नवल बघाया नवनीत आले 

ध्यान तियेचे उघडी डोळे
ध्यान तियेचे उघडी डोळे
दृष्टीपुढती देवकीनंदन
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
धन्यवाद 🙏