Wednesday, 16 June 2021

प्रेम स्वरूप आई

प्रेमस्वरूप आ..ई वात्सल्यसिंधु आ..ई 
बोलावुं तूज आ..ता मी कोणत्या उपायीं
आआआ, प्रेमस्वरूप आ..ई
*स्वर-लता मंगेशकर*
नाहीं जगांत झाली ,आबाळ या जिवाची..
नाहीं जगांत झाली ,आबाळ या जिवाची..
तूझी उणी..व चित्तीं आई..तरीहि जाची..
चित्तीं तुझी स्मरेना.. कांहींच रूपरे..खा,
आई हवी म्हणू..नी.. सोडी न जीव हे..का 
प्रेमस्वरूप आ..ई
*कवि-माधव ज्युलियन*
ही भूक पोरक्याची..होई न शांत आ..ई,
पाहूनियां दुज्यां..चें वात्सल्य लोचनांहीं.. 
वाटे इथून जावें..तूझ्यापुढें निजा..वें,
नेत्रीं तुझ्या हसा..वें..चित्तीं तुझ्या ठसावें..
प्रेमस्वरूप आ..ई
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
वक्षीं तुझ्या परि हें,केव्हां स्थिरेल डोकें..
वक्षीं तुझ्या परि हें,केव्हां स्थिरेल डोकें..
देईल शां..तवाया हृत्स्पं..द मंद झोके.. 
घे जन्म तूं फिरूनी..येईन मीहि पो..टीं,
खोटी ठरो न दे..वा.. ही एक आस मो..ठी 
प्रेमस्वरूप आ..ई,आ..ई....
धन्यवाद 🙏

राधा गौळण करिते मंथन

राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
*स्वर-आशा भोसले*

सुवर्ण चंपक यौवनकांती 
हिंदोळत ती मागे पुढती 
सुवर्ण चंपक यौवनकांती 
हिंदोळत ती मागे पुढती 

उजव्या डाव्या झुलत्या हाती 
उजव्या डाव्या झुलत्या हाती 
कृष्ण कृष्ण ते बोलत कंकण 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 

*सौजन्य-रविंद्र झांबरे*
नाद मुरलीचा पडता कानी 
नाद मुरलीचा पडता कानी 
बावरली ती गोकुळ हरिणी 
गोकुळ हरिणी 
नाद मुरलीचा पडता कानी 
बावरली ती गोकुळ हरिणी 

छुमछुम छंदी घुंगुर चरणी 
छुमछुम छंदी घुंगुर चरणी 
गुण गोविंदी गेली रंगून 
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 

💃💃💃💃💃💃
राधेविण ते मंथन चाले 
नवल बघाया नवनीत आले 
राधेविण ते मंथन चाले 
नवल बघाया नवनीत आले 

ध्यान तियेचे उघडी डोळे
ध्यान तियेचे उघडी डोळे
दृष्टीपुढती देवकीनंदन
राधा गौळण करिते मंथन 
अविरत हरीचे मनात चिंतन 
धन्यवाद 🙏

बिकटवाट वहिवाट नसावी

🌷अनंत फंदींचा फटका🌷
बिकट वाट वहिवाट नसावी, 
धोपट मार्गा सोडु नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको

*स्वर-उदेश उमप*
मायबापांवर रुसूं नको
अन् दुर्मुखलेला असूं नको
मायबापांवर रुसूं नको
अन् दुर्मुखलेला असूं नको

व्यवहारमधी फसूं नको
अन् कधी रिकामा बसू नको
व्यवहारमधी फसूं नको
अन् कधी रिकामा बसू नको

परी उलाढाली भलभलत्या, 
पोटासाठी करू नको
परी उलाढाली भलभलत्या, 
पोटासाठी करू नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको

*गीत अनंत फंदी*
मी मोठा शाहणा, धनाढ्यही, 
गर्वभार हा वाहू नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यही, 
गर्वभार हा वाहू नको

एकाहूनू चढ एक जगामंधि, 
थोरपणाला मिरवू नको
एकाहूनू चढ एक जगामंधि, 
थोरपणाला मिरवू नको

दो दिवसाची जाइल सत्ता, 
अपेश माथा घेउ नको
दो दिवसाची जाइल सत्ता, 
अपेश माथा घेउ नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
*सौजन्य रविंद्र झांबरे*

उगीच निंदा स्तुती कुणाची 
स्वहितासाठी करू नको
उगीच निंदा स्तुती कुणाची 
स्वहितासाठी करू नको

कष्टाची बरी भाजिभाकरी, 
तूपसाखरे चोरू नको
कष्टाची बरी भाजिभाकरी, 
तूपसाखरे चोरू नको

दिली स्थिती देवाने तीतच 
मानी सुख, कधीं विटू नको
दिली स्थिती देवाने तीतच 
मानी सुख, कधीं विटू नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको

बिकट वाट वहिवाट नसावी, 
धोपट मार्गा सोडु नको
बिकट वाट वहिवाट नसावी, 
धोपट मार्गा सोडु नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको

संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
संसारामधी ऐस आपला, 
उगाच भटकत फिरू नको
धन्यवाद 🙏

हटा तटाने पटा रंगवूनी

🌹शाहीर राम जोशी🌹
१)अरे हटातटाने पटा रंगवुनि 
जटा धरिशि कां शिरी... 
मठाची उठाठेव कां... तरी 
हटातटाने पटा ,अरे हटातटाने पटा
रंगवुनि जटा धरिशि कां शिरी 
मठाची उठाठेव कां तरी 
२)मठाची उठाठेव कां तरी 
मठाची उठाठेव कां तरी 
१)वनांत अथवा जनांत हो कां..
वनांत अथवा जनांत हो कां
मनांत व्हावे परि 
हरीचें २)नांव भवांबुधी तरी
हरीचें २)नांव भवांबुधी तरी
१)काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे 
ही काय भवाला दूर करतिल माकडें 
२)ही काय भवाला दूर करितिल माकडें 
१)बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे हे हे हे 
अशा भक्तिच्या रसा रहित 
तूं कसा म्हणविशी बुधा 
हरिरस ,२)सांडुन घेशी दुधा 
हरिरस ,२)सांडुन घेशी दुधा 
१)भला जन्म हा तुला लाधला हा हा हा 
२)भला जन्म हा तुला लाधला हा हा हा 
१)भला जन्म हा तुला लाधला 
खुलास ह्रदयीं बुधा 
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा 
२)धरिसी तरि हरिचा सेवक सुधा 
१)शिळा टोपिवर शिळा पडो या 
बिळांत करिसी जपा आ आ आ 
तथापि न होय हरीची कृपा 
२)तथापि न होय हरीची कृपा 
१)दर्भ मुष्टिच्या..गर्भि धरुनि 
दर्भ मुष्टिच्या..गर्भि धरुनि 
निर्भर पशुची वपा हा हा हा हा 
निर्भर पशुची वपा 
जाळिशी तिळा तांदुळा तुपा 
२)जाळिशी तिळा तांदुळा तुपा 
जाळिशी तिळा तांदुळा तुपा 
१)दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा 
न सार्थक लटक्या सार्‍या गपा 
२)न सार्थक लटक्या सार्‍या गपा
१)ही बारबार तलवार येईल काय पुन्हां 
२)येईल काय पुन्हां 
१)ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा 
२)ठेविशी कुण्हा 
१)भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा 
आ आ आ हा हा हा... 
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा 
सदा हरि कविरायावर फिदा 
२)सदा हरि कविरायावर फिदा 
सदा हरि कविरायावर फिदा 
(१+२) हटातटाने पटा अरे हटातटाने पटा
रंगवुनि जटा धरिशि कां शिरी 
मठाची उठाठेव कां तरी 
मठाची उठाठेव कां तरी 
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏

नाच ग घुमा

💃💃गौरीगीत💃💃 
२)नाच ग घुमा, १)कशी मी नाचू
नाच ग घुमा, १)कशी मी नाचू
नाच ग घुमा, १)कशी मी नाचू
नाच ग घुमा 
१)ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला 
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
१)ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला 
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा 
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा

१)ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला 
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा 
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
कशी मी नाचू,२)नाच ग घुमा
(हसून 😅)
*स्वर-उषा मंगेशकर*
२)फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी 
फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी 
१)पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
२)फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी 
 फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी
फू फू फू फू फू फू फू (हसुन 😁)
💃💃💃💃💃💃💃💃💃
१)बारा घरच्या बायका एका जागी मिळू या
२)बारा घरच्या बायका एका जागी मिळू या
१)चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
 २)चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या

१)लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
२)लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
१)वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
२)वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
१)बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
२)चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या 
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या 
*सौजन्य-रविंद्र झांबरे*
१)घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
२)घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
१)गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
२)गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
💃💃💃💃💃💃💃💃
१)नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
२)नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
१+२)घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
धन्यवाद 🙏

रुप तुझं लयी छान

🌷दादांची दादागिरी🌷
रुप तुझं लयी छान गं 
माझं हरपून गेलं भान गं 
हे पोरी रुप तुझं लयी छान गं 
माझं हरपून गेलं भान गं 
हो,  सुंदर मुखडा,सोन्याचा तुकडा 
व्हटात रंगलं पान गं 
हे, करु नको गुणगान रं 
माझ्या मनातलं तू जाण रं 
आरं, करु नको गुणगान रं 
माझ्या मनातलं तू जाण रं 
🌷स्वर-उषा मंगेशकर महेंद्र कपूर🌷
चेहर्‍यात पोरी तुझ्या चांदोबा हसतो 
डोळ्यात नाचतंय चांदणं गं...
कुरळ्या केसात वारा हा फसतो 
कपाळी दिसतंय गोंदण गं 
देवाचं हे वरदान गं 
माझं हरपून गेलं भान गं 
हं,करु नको गुणगान रं 
माझ्या मनातलं तू जाण रं 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
धरू नको रं मिठीत मजला 
कुणीतरी अवचित पाहील ना...
हो, पदर बाई माझा घामानं भिजला 
तोल मनाचा जाईल ना 
होऊ नको बेभान रं 
माझ्या मनातलं तू जाण रं 
हुर्र..रुप तुझं लयी छान गं 
माझं हरपून गेलं भान गं
🌹चित्रपट-मला घेऊन चला🌹
तालावरती चाल तुझी ही 
कंबर हलते झोकात गं...
हे, गालावरचा तीळ तुझा हा 
उठून दिसतोय लाखात गं
करीन जीव कुरबान गं 
माझं हरपून गेलं भान गं 
आरं, करु नको गुणगान रं 
माझ्या मनातलं तू जाण रं 
हो,  सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा 
व्हटात त रंगलं पान गं 
हे पोरी रुप तुझं लयी छान गं माझं हरपून गेलं भान गं
🙏 धन्यवाद 🙏

पहीली शंभराची नोट माझ्या हाता मध्ये दे

राया माया तुझी माझ्यावर नीट राहू दे 
राया माया तुझी माझ्यावर नीट राहू दे 
हे, पहीली शंभराची नोट माझ्या हाता मध्ये दे 
हे, पहीली शंभराची नोट माझ्या हाता मध्ये दे... 
🌷स्वर उषा मंगेशकर,महेंद्र कपूर🌷 
तु सागर मी जलधारा,मी नौका तु रे किनारा 
सागर मी जलधारा,नवतीचा सुटला वारा
घे जवळ मला दे थारा,नवतीचा सुटला वारा
सारा,देह तुझ्या देहामध्ये एक होऊ दे 
सारा,देह तुझ्या देहामध्ये एक होऊ दे 
हे, पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे 
पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे ना..
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
मज बोलकी रे श्रीहरी,मी तुझीच राधा प्यारी 
बोलकी रे श्रीहरी,मज संकट पडलंय भारी 
ये धावत धाव मुरारी,संकट पडलंय भारी
सारी,रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे 
सारी,रात तुझ्या संगतीत दंग होऊ दे 
हे, पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे 
पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे...
🌹चित्रपट-बोट लावीन तिथं गुदगुल्या🌹
का रुसला रे तू राजा,कळवळतंय मनात माझ्या 
रुसला रे तू राजा,घरी जाऊन करूया मज्जा 
बंद करूनीया दरवाजा,घरात करूया मज्जा 
तुझ्या,डोळ्यामदी,माझं मला रुप पाहू दे 
तुझ्या,डोळ्यामदी,माझं मला रुप पाहू दे 
हे, पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे ना 
पहीली शंभराची नोट,माझ्या हाता मध्ये दे..
🙏 धन्यवाद 🙏