Wednesday, 16 June 2021

आला थंडीचा महिना

आला थंडीचा महिना आ आ आ आ हां...
आला थंडीचा महिना,झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला अहं 
मला लागलाय खोकला,मधाचं बोट कुनी चाटवा
हो, मला लागलाय खोकला अहं
🌷स्वर-उषा मंगेशकर🌷
कवळ्या मनातं इनलय,नाजूक पिरतीच जाळं
काही सुचंना बाई मी,करतेया भलतंच चाळं
रोज सपनात येतंय...
रोज सपनात येतंय,रांगत देखणं बाळ 
त्याच्यासाठी मी बांधलाय,पाळणा नी मांडलाय खेळ 
झोप लागं ना बाई गं ह ह ह ह हां 
झोप लागं ना बाई गं ,सख्याला निरोप पाठवा
मला लागलाय खोकला अहं 
मला लागलाय खोकला,मधाचं बोट कुनी चाटवा
हो, मला लागलाय खोकला अहं अहं 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
तुमच्या साठीचं आले,मोडून माझं मी लग्न
द्या सोडून घर दार,चलाकी माझ्या मागनं...
💃💃💃💃💃💃
असं किती चालायचं,नुस्तच दुरून बघणं
तुमच्या वाचुन झालया,मला बी अवघड जगणं
लय वाढलया दुखणं ह ह ह ह हां
लय वाढलया दुखणं,खात्रीचा हकीम भेटवा 
मला लागलाय खोकला अहं 
मला लागलाय खोकला,मधाचं बोट कुनी चाटवा
हो,मला लागलाय खोकला अहं
❤चित्रपट-ह्योच नवरा पाहिजे❤
नका बिचकू पावणं,किती तुम्हा सांगावं
घ्या पुढ्यात मजला,प्रेमानं कुरवाळावं
पाया पडते मी तुमच्या...
पाया पडते मी तुमच्या,थोडंसं ऐकाल का वं
बांधा गळ्यात डोरलं,कोरून तुमचं नाव 
कसं मायेचं पाखरू हू हू हू हू हां 
कसं मायेचं पाखरू,झोपलय हलवून उठवा
मला लागलाय खोकला अहं 
मला लागलाय खोकला,मधाचं बोट कुनी चाटवा
आला थंडीचा महिना,झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला,मधाचं बोट कुनी चाटवा
हो, मला लागलाय खोकला अहं अहं अंहं 
🙏धन्यवाद🙏

आडला नारायण धरी गाढवाचे पाय

😇आडला नारायण😇
येळ आली बाका तिथं देव करी काय हो 
देव करी काय हो 
येळ आली बाका तिथं देव करी काय हो 
देव करी काय हो 
हा, देव करी काय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो हरीहरी 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
🌷स्वर-महेंद्र कपुर🌷
मर मर राबुनिया दिनरात
रस्त्यावर मिळंल ते पोटाला खातं 
माणसाची दुःख सारी पाठीवर घेतं 
हो, तरी त्याला म्हणत्यात गाढवाची जात काहो 
तरी त्याला म्हणत्यात गाढवाची जात
याच्यासाठी एकनाथही रडला धायधाय हो 
रडला धायधाय हो 
हा, रडला धायधाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो हरीहरी 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
कशी या दुनियेची रीत उफराटी
संकट लागतयां सत्याच्या पाठी 
हरामी खात्यात तुप अन् रोटी 
गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी बोला 
गरीबाच्या माथ्यावर शेणाची पाटी 
निवडुन गेल्यावरती नेता जो तो पैसे खाय हो 
जो तो पैसे खाय हो
हा, जो तो पैसे खाय हो
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो, हरीहरी
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
🌹चित्रपट-आली अंगावर 🌹
सतयुग मेलं झालं कलियुग जागं 
माणूस लागलाय पैशाच्या मागं 
दमडीच्या मालाला रुपाया लागं 
काय म्हणावं या कर्माचा भोग आपल्या 
काय म्हणावं या कर्माचा भोग
आरे सोन्याच्या भावाला साखर विकली जाय हो 
साखर विकली जाय हो 
हा, साखर विकली जाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
🙏दादा कोंडके🙏
हा, जुन्या जमान्याची ऐकावी थोरी 
घरदार गेलं तरी वचनाला तारी 
शिकून लोकं झाली सुधारणा भारी 
बापाला नेत्यात कोर्टाच्या दारी पोरं 
बापाला नेत्यात कोर्टाच्या दारी
आरे,शानीसवरती म्हणून म्हणती 
कायदा गाढव हाय हो ,
कायदा गाढव हाय हो 
हा, कायदा गाढव हाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो हरीहरी 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
😀😀😀😀😀😀😀😀
विसरून जात बोका उंदराला भितो 
घुशीच्या बीळात वाघोबा राहतो 
बायकोची कमाई नवरोबा खातो 
देव तरी सारं कसं खपवून घेतो आता.. 
देव तरी सारं कसं खपवून घेतो
अन् पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो 
बसली आता बाय हो 
हा, बसली आता बाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो हरीहरी 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो 
🙏 धन्यवाद 🙏

वेगळ्या जगात या

🌷स्वर-आशा भोसले सुरेश वाडकर🌷
🌹चित्रपट-बंदीवान मी या संसारी🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
ती- वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
धुंद या स्वरा..त मी,आज रंग रंगले
धुंद या स्वरा..त मी,आज रंग रंगले
वेगळ्या जगा..त या.......
तो-  वेगळ्या जगा..त या,सुर आज रंगले
वेगळ्या जगा..त या,सुर आज रंगले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
वेगळ्या जगा..त या... 
🎵💃🎵💃🎵💃🎵
ती- भरारुनं झेप घेई,पाखरु मनाचे...
भरारुनं झेप घेई,पाखरु मना..चे
दाही दिशा मो..कळ्या या,बंध ना कुणाचे.
दाही दिशा मो..कळ्या या,बंध ना कुणाचे.
स्वप्न आज प्रि..तीचे,लोचनात जा..गले
स्वप्न आज प्रि..तीचे,लोचनात जागले
धुंद या स्व..रात मी,आज रंगरंगले
वेगळ्या जगा..त या... 
🎵💃🎵💃🎵💃🎵
तो- झाड वेल फूल पाने,कुजूबुजू बोलती
झाड वेल फूल पाने,कुजूबुजू बोलती
तुझे माझे गुपी..त हे,कानामधी खोलती
तुझे  माझे गुपी..त,हे कानामधी खोलती
एकांती संगतीचे,वेड जणू लागले
एकांती संगतीचे,वेड जणू लागले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
वेगळ्या जगा..त या...
🎵💃🎵💃🎵💃🎵
ती- झोका घेई फांदीवर,प्रित माझी साजना...
झोका घेई फांदीवर,प्रित माझी साजना
तो - मिठी मध्ये रेशमाच्या,येशील का सांगना
मिठी मध्ये रेशमाच्या,येशील का सांगना
दोघे--स्पर्श हा नवानवा,रोमरोम झिंगले
स्पर्श हा नवानवा, रोमरोम झिंगले
ती- धुंद या स्वरात मी आज रंगरंगले
तो-धुंद या स्वरात मन श, आज दंगदंगले
ती- वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
तो-वेगळ्या जगात या,सुर आज रंगले
ती-धुंद या स्वरात मी,आज रंगरंगले
तो-धुंद या स्वरात मन ,आज दंग दंगले
दोघे- ला ला ला लाला ला.
          ला ला ला ला ला
           ला ला ला ला ला
            ला ला ला ला
🙏 धन्यवाद 🙏



रंग माझा तुला

रंग माझा तुला ...
रंग माझा तुला,गंध माझा तुला 
बोल काहीतरी,बोल काहीतरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला 
🌷स्वर-अरुण दाते🌷
सांग लाजू..नही नाव आतातरी
सांग लाजू..नही नाव आतातरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन्‌ वसंतास मी...
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🌹कवी-सुरेश भट🌹
वेळ जादू..भरी, ही गुलाबी हवा 
वेळ जादू..भरी, ही गुलाबी हवा 
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा 
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा 
भास झाला खरा...
भास झाला खरा ,ध्यास माझा खुळा 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आज माझी तुझी,भेट झाली अशी 
शीळ यावी पुढे,चांदण्याची जशी
शीळ यावी पुढे,चांदण्याची जशी
सांग, सोडू कसा हा हा हा 
सांग, सोडू कसा,हात हातातला 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🙏 धन्यवाद 🙏

माझ्या भावाला माझी माया कळू दे

जीव भोळा खुळा..कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🌷स्वर-आशा भोसले🌷
आई बाबांची सावली सरं...
छाया भावाची डोईवर उरं
आई बाबांची सावली सरं...
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई....
आई अंबाबाई ,तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
माय लक्षुमी त्याच्या मागं पळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🌹चित्रपट-आंधळा मारतो डोळा🌹
बायको मिळंल भावाला देखणी...
बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची, डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वरसा-वरसाला त्याचा पाळणा हलू दे
माझ्या भावाला....
(हसावे 😄😄😄😄😄😄)

Friday, 11 June 2021

रंगान गोरी गुलाबी छोरी

🌷स्वर-सुरेश वाडकर,कविता कृष्णमूर्ती🌷
🌹चित्रपट-भुताचा भाऊ🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
हो, नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला जा जा जा 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी.. 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
तो-गुपचुप रानामधी गुल्लाबाच्या कानामध्ये 
हळूच सांगेन मी आय लव यू..
ती-नुको नको ओठावरी भाव हवा मनामधे 
जाणून घेना तू आय लव यू..
तो-गुपचुप रानामधी गुल्लाबाच्या कानामध्ये 
हळूच सांगेन मी आय लव यू 
ती-हे,नको नको ओठावरी भाव हवा मनामधे 
जाणून घेना तू आय लव यू 
तो-प्रीत ही छेड ना 
ती-ही मिठी वेढ ना 
तो-प्रीत ही छेड ना 
ती-ही मिठी वेढ ना ना ना ना 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी 
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
हो, नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺🌹🕺
ती-ऋतु नवा बहराचा गाव जणु प्रेमीकांचा 
तुलाच पाहीन मी भवताली.. 
तो-मधुचंद्र फुलवूया तारुण्याला सजवूया 
मिठीत घेईन मी पट्टराणी.. 
ती-ऋतु नवा बहराचा गाव जणु प्रेमीकांचा 
तुलाच पाहीन मी भवताली 
तो-मधुचंद्र फुलवूया तारुण्याला सजवूया 
मिठीत घेईन मी पट्टराणी 
ती-रेशमी हा गुन्हा 
तो-होऊदे ना पुन्हा 
ती-रेशमी हा गुन्हा 
तो-होऊदे ना पुन्हा (ती) ना ना ना 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी.. 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
🙏धन्यवाद 🙏

म्होरं हो गंगूबाई

मनात मन तुझ्या गुंतलय सार
एकांती चल तुला सांगतेया खरं
अगं म्होरं हो गंगुबाय
तुझ्या मागुन मी येतो...
गळ्याची आण माझ्या घेशील कां ग  
अन मागिन ते दान मला देशील कां ग
जा बाई जा गंगाराम
मला शरम येती
🌷स्वर उषा मंगेशकर,महेंद्र कपूर🌷
फिरशील कां भवतीनं
देत मायेचा गारवा
अग देईन मी गारवा
जसा घुमतो पारवा...
अन बोलूया गुलुगुलु
दूर गावाच्या वेशीत  
अगं गावाच्या वेशीत
तुला घेईन मी कुशीत...
घरात नीट माझ्या वागशील कां ग
न् सासुचे हातपाय दाबशील कां ग 
जमायचं न्हाय गंगाराम 
मी उदयाला येते
जमायचं न्हाय गंगाराम 
मी उदयाला येते
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
गाउ या धुंदीत
न्हाऊ चांदण्या रातीत
चांदण्या रातीत
खुप लोळुया मातीत...
खेळू या लपाछपी 
दोघं केवडयाच्या  बनात 
केवडयाच्या  बनात
बसु बिलगून पानात...
बकरीला माझ्या जपशील कां रं
शेंगांच्या शेतात राबशील कां रं 
अगं म्होरं हों गंगुबाय  
तुझ्या मागुन मी येतो
म्होरं हों गंगुबाय  
तुझ्या मागुन मी येतो
🌹चित्रपट रामराम गंगाराम🌹
होशील कां माझा तूं
सांग सनईच्या सुरात 
अगं सनईच्या सुरात
राहु बिल्लोरी घरात...
थाटु या संसार बाई
तुम्ही न मी जोडीनं 
तू अन मी जोडीनं 
राघू मैनेच्या गोडीनं... 
म्हशीची धार तूं काढशील कां ग    
पाळण्याची दोरी तू वढशील  कां ग 
आं...आवं चला चला गंगाराम 
मी आताच येते
🙏 धन्यवाद 🙏