Wednesday, 16 June 2021

वेगळ्या जगात या

🌷स्वर-आशा भोसले सुरेश वाडकर🌷
🌹चित्रपट-बंदीवान मी या संसारी🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
ती- वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
धुंद या स्वरा..त मी,आज रंग रंगले
धुंद या स्वरा..त मी,आज रंग रंगले
वेगळ्या जगा..त या.......
तो-  वेगळ्या जगा..त या,सुर आज रंगले
वेगळ्या जगा..त या,सुर आज रंगले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
वेगळ्या जगा..त या... 
🎵💃🎵💃🎵💃🎵
ती- भरारुनं झेप घेई,पाखरु मनाचे...
भरारुनं झेप घेई,पाखरु मना..चे
दाही दिशा मो..कळ्या या,बंध ना कुणाचे.
दाही दिशा मो..कळ्या या,बंध ना कुणाचे.
स्वप्न आज प्रि..तीचे,लोचनात जा..गले
स्वप्न आज प्रि..तीचे,लोचनात जागले
धुंद या स्व..रात मी,आज रंगरंगले
वेगळ्या जगा..त या... 
🎵💃🎵💃🎵💃🎵
तो- झाड वेल फूल पाने,कुजूबुजू बोलती
झाड वेल फूल पाने,कुजूबुजू बोलती
तुझे माझे गुपी..त हे,कानामधी खोलती
तुझे  माझे गुपी..त,हे कानामधी खोलती
एकांती संगतीचे,वेड जणू लागले
एकांती संगतीचे,वेड जणू लागले
धुंद या स्वरा..त मन,आज दंग दंगले
वेगळ्या जगा..त या...
🎵💃🎵💃🎵💃🎵
ती- झोका घेई फांदीवर,प्रित माझी साजना...
झोका घेई फांदीवर,प्रित माझी साजना
तो - मिठी मध्ये रेशमाच्या,येशील का सांगना
मिठी मध्ये रेशमाच्या,येशील का सांगना
दोघे--स्पर्श हा नवानवा,रोमरोम झिंगले
स्पर्श हा नवानवा, रोमरोम झिंगले
ती- धुंद या स्वरात मी आज रंगरंगले
तो-धुंद या स्वरात मन श, आज दंगदंगले
ती- वेगळ्या जगात या,अशी कशी दंगले
तो-वेगळ्या जगात या,सुर आज रंगले
ती-धुंद या स्वरात मी,आज रंगरंगले
तो-धुंद या स्वरात मन ,आज दंग दंगले
दोघे- ला ला ला लाला ला.
          ला ला ला ला ला
           ला ला ला ला ला
            ला ला ला ला
🙏 धन्यवाद 🙏



रंग माझा तुला

रंग माझा तुला ...
रंग माझा तुला,गंध माझा तुला 
बोल काहीतरी,बोल काहीतरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला 
🌷स्वर-अरुण दाते🌷
सांग लाजू..नही नाव आतातरी
सांग लाजू..नही नाव आतातरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन्‌ वसंतास मी...
अन्‌ वसंतास मी शब्द माझा दिला 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🌹कवी-सुरेश भट🌹
वेळ जादू..भरी, ही गुलाबी हवा 
वेळ जादू..भरी, ही गुलाबी हवा 
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा 
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा 
भास झाला खरा...
भास झाला खरा ,ध्यास माझा खुळा 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
आज माझी तुझी,भेट झाली अशी 
शीळ यावी पुढे,चांदण्याची जशी
शीळ यावी पुढे,चांदण्याची जशी
सांग, सोडू कसा हा हा हा 
सांग, सोडू कसा,हात हातातला 
बोल काहीतरी,बोल काही..तरी 
बोल माझ्या फुला 
रंग माझा तुला,गंध माझा तुला
🙏 धन्यवाद 🙏

माझ्या भावाला माझी माया कळू दे

जीव भोळा खुळा..कसा लावू लळा
देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🌷स्वर-आशा भोसले🌷
आई बाबांची सावली सरं...
छाया भावाची डोईवर उरं
आई बाबांची सावली सरं...
छाया भावाची डोईवर उरं
आई अंबाबाई....
आई अंबाबाई ,तुला मागू काही
बंधुरायाची इडापिडा दूर टळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
भाऊ होईल गुणानं मोठ्ठा
तिथं सुखाला कसला तोटा
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
त्याची किरत अशी जाता दाही दिशी
माय लक्षुमी त्याच्या मागं पळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माया कळू दे,माझी माया कळू दे
माझ्या भावाला माझी माया कळू दे
🌹चित्रपट-आंधळा मारतो डोळा🌹
बायको मिळंल भावाला देखणी...
बायको मिळंल भावाला देखणी
चपट्या नाकाची, डोळ्यानं चकणी
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वैनीबाई जरा, त्याला शानं करा
वरसा-वरसाला त्याचा पाळणा हलू दे
माझ्या भावाला....
(हसावे 😄😄😄😄😄😄)

Friday, 11 June 2021

रंगान गोरी गुलाबी छोरी

🌷स्वर-सुरेश वाडकर,कविता कृष्णमूर्ती🌷
🌹चित्रपट-भुताचा भाऊ🌹
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
हो, नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला जा जा जा 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी.. 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
तो-गुपचुप रानामधी गुल्लाबाच्या कानामध्ये 
हळूच सांगेन मी आय लव यू..
ती-नुको नको ओठावरी भाव हवा मनामधे 
जाणून घेना तू आय लव यू..
तो-गुपचुप रानामधी गुल्लाबाच्या कानामध्ये 
हळूच सांगेन मी आय लव यू 
ती-हे,नको नको ओठावरी भाव हवा मनामधे 
जाणून घेना तू आय लव यू 
तो-प्रीत ही छेड ना 
ती-ही मिठी वेढ ना 
तो-प्रीत ही छेड ना 
ती-ही मिठी वेढ ना ना ना ना 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी 
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला 
हो, नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺🌹🕺
ती-ऋतु नवा बहराचा गाव जणु प्रेमीकांचा 
तुलाच पाहीन मी भवताली.. 
तो-मधुचंद्र फुलवूया तारुण्याला सजवूया 
मिठीत घेईन मी पट्टराणी.. 
ती-ऋतु नवा बहराचा गाव जणु प्रेमीकांचा 
तुलाच पाहीन मी भवताली 
तो-मधुचंद्र फुलवूया तारुण्याला सजवूया 
मिठीत घेईन मी पट्टराणी 
ती-रेशमी हा गुन्हा 
तो-होऊदे ना पुन्हा 
ती-रेशमी हा गुन्हा 
तो-होऊदे ना पुन्हा (ती) ना ना ना 
तो-रंगानं गोरी.. गुलाबी छोरी.. 
रंगानं गोरी.. गुलाबी छोरी..
मनातलं सांगतोय हवं ते मागतोय 
पाहुया.. मुहूर्त लग्नाला 
ती-नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
नको बांधू साजना रे बाशिंग गुडघ्याला
💃🕺💃🕺💃🕺💃🕺
🙏धन्यवाद 🙏

म्होरं हो गंगूबाई

मनात मन तुझ्या गुंतलय सार
एकांती चल तुला सांगतेया खरं
अगं म्होरं हो गंगुबाय
तुझ्या मागुन मी येतो...
गळ्याची आण माझ्या घेशील कां ग  
अन मागिन ते दान मला देशील कां ग
जा बाई जा गंगाराम
मला शरम येती
🌷स्वर उषा मंगेशकर,महेंद्र कपूर🌷
फिरशील कां भवतीनं
देत मायेचा गारवा
अग देईन मी गारवा
जसा घुमतो पारवा...
अन बोलूया गुलुगुलु
दूर गावाच्या वेशीत  
अगं गावाच्या वेशीत
तुला घेईन मी कुशीत...
घरात नीट माझ्या वागशील कां ग
न् सासुचे हातपाय दाबशील कां ग 
जमायचं न्हाय गंगाराम 
मी उदयाला येते
जमायचं न्हाय गंगाराम 
मी उदयाला येते
🙏सौजन्य रविंद्र झांबरे🙏
गाउ या धुंदीत
न्हाऊ चांदण्या रातीत
चांदण्या रातीत
खुप लोळुया मातीत...
खेळू या लपाछपी 
दोघं केवडयाच्या  बनात 
केवडयाच्या  बनात
बसु बिलगून पानात...
बकरीला माझ्या जपशील कां रं
शेंगांच्या शेतात राबशील कां रं 
अगं म्होरं हों गंगुबाय  
तुझ्या मागुन मी येतो
म्होरं हों गंगुबाय  
तुझ्या मागुन मी येतो
🌹चित्रपट रामराम गंगाराम🌹
होशील कां माझा तूं
सांग सनईच्या सुरात 
अगं सनईच्या सुरात
राहु बिल्लोरी घरात...
थाटु या संसार बाई
तुम्ही न मी जोडीनं 
तू अन मी जोडीनं 
राघू मैनेच्या गोडीनं... 
म्हशीची धार तूं काढशील कां ग    
पाळण्याची दोरी तू वढशील  कां ग 
आं...आवं चला चला गंगाराम 
मी आताच येते
🙏 धन्यवाद 🙏

अगं ईमला तुझा माझा जोडा

अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
मला दावा उटी नाहीतर सिमला सिमला सिमला 
आता बोंबला...
🌷स्वर-उषा मंगेशकर महेंद्र कपूर🌷
धुकं आलंया लय गं दाटून चल ईथंच घेऊया भेटून 
नको चालू असा मला खेटून साडी गुलाबी जाईल...
साडी गुलाबी जाईल...
साडी गुलाबी जाईल फाटून
सारं रघात आलंया गोठून उब व्हटाची देशील का वाटून
नका मारु मिठी अशी पाठून कोरी जवानी जाईल...
कोरी जवानी जाईल...
कोरी जवानी जाईल बाटून 
मला थंडीचा वारा झोंबला झोंबला झोंबला
आता बोंबला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
माझ्या रूपानं तुम्ही का झिंगला झिंगला झिंगला
आता बोंबला...
🙏सौजन्य रविंद्र झांबरे 🙏
तुझ्या व्हटांत डाळींब फुटं गं 
माझं काळीज तिळ तिळ तुटं 
तुम्ही मुलखाचं चावट वं सांगा सोडाल का. ..
जरा सोडाल का...
माझं सोडाल का मनगट 
तुझी लवलवती कंबर गं जसं हलतंया झुंबर 
माझ्या दिलाच्या किल्ल्यावर हो, तुम्ही चढांल का ..
सांगा चढांल का ...
आता चढांल का सरसर 
सारं करून जीव हा दमला दमला दमला 
आता बोंबला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
माझ्यासाठी बांधा एक बंगला बंगला बंगला
आता बोंबला...
🌹चित्रपट-आली अंगावर🌹
बघ बांधलाय बंगला नवा गं 
चारी बाजूंनी मोकळी हवा 
आता दारं न् खिडक्या लावा हो मला उचलून हळूच...
जरा उचलून हळूच ...
वर उचलून हळूच ठेवा 
या मऊमऊ गाद्या कशा गं 
त्याच्यावरी या मखमली उशा 
सारं बघून चढली नशा हो तुम्ही कराल का... 
बाई कराल का... 
पुरी कराल का हो आशा 
मला आणा जोडीदार चांगला चांगला चांगला
आता बोंबला...
🙏धन्यवाद🙏

vara halta zulta vara वारा हलता झुलता वारा

🌷💃लावणी लावण्यवती💃🌷
💃🌹💃🌹💃🌹💃🌹💃
वारा हलता झुलता वारा,वारा हलता झुलता वारा 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा हो
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
🌷स्वर-रोशन सातारकर🌷
आज पुनवेची परवणी 
लाट उसळे मनच्या मनी 
ऐका हो माझं धनी,रंगवू रात नर्तनी 
ऐका हो माझं धनी रंगवू रात नर्तनी 
वाजू द्या खुशाल बारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
गगनात कोण धनगर,जमवूनी लाख मेंढरं 
काढीतो धार सरसर,त्याच्याच जमीनीवर 
काढीतो धार सरसर,त्याच्याच जमीनीवर 
सांडल्या दुधाळ धारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
💃💃💃💃💃💃💃💃
तुम्ही कवि कविता करा,ह्रिदयाशी तिजला धरा 
पण माझ्या प्राणेश्वरा,माझी ही चिंता हरा 
आजतरी दिलदारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
💃💃💃💃💃💃💃💃💃
सांगे वामनची लावणी येता शुक्राची चांदणी 
गरजेल गावचा धनी संपेल खेळ त्या क्षणी 
आधीच आवरू पसारा टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
वारा हलता झुलता वारा
🙏धन्यवाद 🙏