Friday, 11 June 2021

अगं ईमला तुझा माझा जोडा

अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
मला दावा उटी नाहीतर सिमला सिमला सिमला 
आता बोंबला...
🌷स्वर-उषा मंगेशकर महेंद्र कपूर🌷
धुकं आलंया लय गं दाटून चल ईथंच घेऊया भेटून 
नको चालू असा मला खेटून साडी गुलाबी जाईल...
साडी गुलाबी जाईल...
साडी गुलाबी जाईल फाटून
सारं रघात आलंया गोठून उब व्हटाची देशील का वाटून
नका मारु मिठी अशी पाठून कोरी जवानी जाईल...
कोरी जवानी जाईल...
कोरी जवानी जाईल बाटून 
मला थंडीचा वारा झोंबला झोंबला झोंबला
आता बोंबला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
माझ्या रूपानं तुम्ही का झिंगला झिंगला झिंगला
आता बोंबला...
🙏सौजन्य रविंद्र झांबरे 🙏
तुझ्या व्हटांत डाळींब फुटं गं 
माझं काळीज तिळ तिळ तुटं 
तुम्ही मुलखाचं चावट वं सांगा सोडाल का. ..
जरा सोडाल का...
माझं सोडाल का मनगट 
तुझी लवलवती कंबर गं जसं हलतंया झुंबर 
माझ्या दिलाच्या किल्ल्यावर हो, तुम्ही चढांल का ..
सांगा चढांल का ...
आता चढांल का सरसर 
सारं करून जीव हा दमला दमला दमला 
आता बोंबला
अगं ईमला तुझा माझा जोडा भारी जमला 
माझ्यासाठी बांधा एक बंगला बंगला बंगला
आता बोंबला...
🌹चित्रपट-आली अंगावर🌹
बघ बांधलाय बंगला नवा गं 
चारी बाजूंनी मोकळी हवा 
आता दारं न् खिडक्या लावा हो मला उचलून हळूच...
जरा उचलून हळूच ...
वर उचलून हळूच ठेवा 
या मऊमऊ गाद्या कशा गं 
त्याच्यावरी या मखमली उशा 
सारं बघून चढली नशा हो तुम्ही कराल का... 
बाई कराल का... 
पुरी कराल का हो आशा 
मला आणा जोडीदार चांगला चांगला चांगला
आता बोंबला...
🙏धन्यवाद🙏

vara halta zulta vara वारा हलता झुलता वारा

🌷💃लावणी लावण्यवती💃🌷
💃🌹💃🌹💃🌹💃🌹💃
वारा हलता झुलता वारा,वारा हलता झुलता वारा 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा हो
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
🌷स्वर-रोशन सातारकर🌷
आज पुनवेची परवणी 
लाट उसळे मनच्या मनी 
ऐका हो माझं धनी,रंगवू रात नर्तनी 
ऐका हो माझं धनी रंगवू रात नर्तनी 
वाजू द्या खुशाल बारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
🙏सौजन्य-रविंद्र झांबरे🙏
गगनात कोण धनगर,जमवूनी लाख मेंढरं 
काढीतो धार सरसर,त्याच्याच जमीनीवर 
काढीतो धार सरसर,त्याच्याच जमीनीवर 
सांडल्या दुधाळ धारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
💃💃💃💃💃💃💃💃
तुम्ही कवि कविता करा,ह्रिदयाशी तिजला धरा 
पण माझ्या प्राणेश्वरा,माझी ही चिंता हरा 
आजतरी दिलदारा,टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा,टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
💃💃💃💃💃💃💃💃💃
सांगे वामनची लावणी येता शुक्राची चांदणी 
गरजेल गावचा धनी संपेल खेळ त्या क्षणी 
आधीच आवरू पसारा टाका पलंग परसदारा हो 
सांगे सख्याला तारा टाका पलंग परसदारा 
वारा हलता झुलता वारा
वारा हलता झुलता वारा
🙏धन्यवाद 🙏

Sunday, 16 May 2021

जय महाराष्ट्र हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी

जय महाराष्ट्र..जय महाराष्ट्र 
हे बोल मराठी खेळती ज्यांच्या ओठी
ते सर्व मराठे आम्ही साडेदहा कोटी 
ऐक्याची शपथ घेऊया काय मग कोटी
झाकून कधी काळीचे 
दैन्य भाळीचे दिसं सोन्याचे 
भविष्यापोटी जी.. जी 
भविष्यापोटी जी.. जी ...
राज्य मराठी नागपुराहून गोव्या पर्यंत 
पैठणेकडे पसरे तिकडे दर्या अपरांत 
तापी वरदा वाहते झुळझुळ तशी वैनगंगा..
तशी वैनगंगा..
अन् भिमा गोदा कृष्णा आणीती जीवन रसरंगा
जीवन रसरंगा,आणीती जीवन रसरंगा
हा दगड फुलांचा मर्द मराठी देश 
कनीकोंडा खाया अंगी फाटका वेष 
परी नसानसातुन संचरतो आवेश 
स्वातंत्र्य देवीचे भक्त उसळते रक्त ईमानी सख्त 
साक्ष परमेश जी..जी 
साक्ष परमेश जी..जी ...
परिमळा माझी कस्तुरी फुलात फुल मोगरी 
जीरंहा जीरंह जीरंह जीजी 
इये मराठीची ऐ घरी,विद्येचा सुकाळू करी 
ती अद्भुत ज्ञानेश्वरी,तुकोबांची भावपंढरी 
ईथे कडेकपारी मधुन,घुमली शाहीरी जी जी 
घुमली शाहीरी जी जी 
होश जहाल चिपळूनकरी,केशवसुत देती ललकारी न्
गर्जती टीळक केसरी..
हरिभाऊंची कादंबरी 
ज्योतिबा धरती अंतरी,अण्णांची नाट्य चातुरी 
देवलांची कोणाला सरी,पुढे कोल्हटकर गडकरी न्
पठ्ठे बापूराव फडकरी,शाहीर हैदर लहरी 
बालकवि निर्झरापरी,केळकर नर्म चातुरी 
सानेगुरुजी भाव निर्झरी,तांब्याची गोड ललकारी
गोड ललकारी जी जी 
गोड ललकारी जी जी 
या मराठीच्या मंदिरी,आसनावरी,थोर कितीतरी 
शारदा पुत्र किर्तीवंत..
कवि कथाकार कलावंत 
किती शाहीर किती संत जी जी 
किती शाहीर किती संत जी जी 
अजंठ्याची कला काय खुले,नागपुरात वैभव झुले 
जीरंहा जीरंह जीरंह जीजी..
वऱ्हाडात कपाशी उले,कृष्णा किनारी शाळू डुले 
कोकणची फळे अन फुले,मुंबईला बघून मन भुले 
हो, मुंबईला बघून मन भुले 
जय महाराष्ट्र गर्जती धरतीची मुले जी जी 
धरतीची मुले जी जी 
मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा..
मराठ्यांची परंपरा तेजस्वी जाणा
धरा मानाचा आणा,त्यांचा त्यागाचा बाणा 
नाही भ्याले मरणा,शिवराय बाजी तानाजी 
ते धनाजी नी संताजी,पेशवाई पहिला बाजी 
अभिमन्यू परी जनकोजी,राघो भरारी नी महादजी 
महादजी हो गोखला बापू रणगाझी,हा हा जी जी, 
हा हा जी जी,हा हा जी जी 
सत्तावन सालचे बंड पेटले चंड 
राहू काय थंड ठोकूनी दंड ठोकूनी दंड..
मराठे प्राण देती समरात 
मर्दानी झाशीवाली हो त्यात 
सायबानं हाय खाल्ली युध्दात जी जी 
सायबानं हाय खाल्ली युध्दात जी जी 
आम्ही नेक मराठे हिंद भुमिचे पुत्र 
आम्ही पूज्य मानतो एकच हिंदी छत्र
आमुचे आम्हाला घर राहूदे मात्र 
ही एक आमुची आस एक हा ध्यास 
याच घोषात करु सर्वत्र जी जी 
करु सर्वत्र जी जी..
सह्याद्रीचे पिऊनी वारे कृष्णेचे पाणी 
हा.. कृष्णेचे पाणी 
वीर मराठे स्वातंत्र्याची गाती जय गाणी 
गाती जय गाणी मराठे गाती जय गाणी 
*स्वर-शाहीर पिराजीराव सरनाईक*
*सौजन्य-रविंद्र झांबरे*

दार उघड बये दार

🌹शाहीर पिराजी सरनाईक🌹
*सौजन्य रविंद्र झांबरे*
उधं ग अंबे उधं
उधं..उधं..
हो, दार उघड बये दार उघड
दार उघड बये दार उघड

हो, दार उघड बये दार उघड
दार उघड बये दार उघड
मातले असुर निर्दाळी
घे त्रिशूळ हातीं आतां भद्रकाली
मातले असुर निर्दाळी
घे त्रिशूळ हातीं आतां भद्रकाली

उधं ग अंबे उधं उधं..
वन्ही तो चेतवावा रे.. 
चेतविताच चेततो..
केल्यानें होत आहे रे.. 
आधीं केलेच पाहिजे..

कडकडे डफावर थाप..
कडकडे डफावर थाप 
होई थरकाप धडकली छाती 
धडकली छाती धडकली छाती 
सांडुनी रक्त हिंदवी 
मराठी माती जीजी 
मराठी माती जीजी..

मावळातल्या मर्द मराठ्या 
घेई सतीचे वाण
मावळातल्या मर्द मराठ्या 
घेई सतीचे वाण
तुला श्री शिवरायाची आण
तुला श्री शिवरायाची आ..ण
जीरं जीरहं जीरहं जीहं 
जीरं जीरहं जीरहं जीहं 
हे रं जी जी 

ऊठ, अरे ऊठ 
ऊठ, ऊठ सांडले रक्त, 
हे देई तुला आव्हान
ऊठ, ऊठ सांडले रक्त, 
हे देई तुला आव्हान

तुला श्री तुळजाईची आण
भवानी तलवारीची आ..ण
जीरं जीरहं जीरहं जीहं 
जीरं जीरहं जीरहं जीहं 
हे रं जी जी 

स्वातंत्र्य हिंदवी रक्षया 
घे तळहाती प्राण
स्वातंत्र्य हिंदवी रक्षया 
घे तळहाती प्राण
लढवी अपुले राष्ट्र निशाण
उडवी रिपुची दाणादा..ण

जीरं जीरहं जीरहं जीहं 
जीरं जीरहं जीरहं जीहं 
हे रं जी जी जी

तुडवित रिपुदल टापाखालीं 
घोडदौड संचरे
तुडवित रिपुदल टापाखालीं 
घोडदौड संचरे
आणि 'हर हर महादेव' गर्जती 
सह्याद्रीची शिखरे

हर हर महादेव
हर हर महादेव..
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, 
महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा
जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, 
महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा

आणि रक्तफुलांनीं रणीं बांधली 
तुझी महापूजा
आणि रक्तफुलांनीं रणीं बांधली 
तुझी महापूजा
परकीया तें खडे चारिलें, 
विजयाचे चौघडे..
परकीया तें खडे चारिलें, 
विजयाचे चौघडे

आणि महाराष्ट्र मंदिरावरी 
हा भगवा ध्‍वज फडफडे
जय महाराष्ट्र 
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 
जय महाराष्ट्र

Monday, 13 February 2017

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार
================

बोटावर मोजण्या ईतके मराठा लोक सोडले तर ईतर सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती काय आहे ?
    मराठा समाज पिढ्यांपिढ्या शेतीवर गुजराण करत आला आहे . सत्ताधारी कुणीही असो सर्वांनीच शेतकरी समाजाच्या ( जो बहुसंख्य मराठा आहे ) तोंडाला पाने पुसली आहेत . शेतकऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केले आहे , कुठल्याही ठोस योजना राबवल्या नाहीत .
एकतर शेती व्यवसाय बेभरवशाचा , निसर्गावर अवलंबून , त्यातही शेतीमालाला हमीभाव नाही आणि यावर कडी म्हणजे दलाल पध्दत ... यात पिळवटलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले नाही तर नवलच ...!!!
आरक्षणाचा विषय निघाला की अनेक तथाकथित विद्वानांची ओरड सुरू होते .. मराठा सधन आहे , सामाजिक दृष्टीने उच्च आहे , राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे ....!!!
    अरे होय बाबा ..पण तुम्ही कुठल्या मराठ्यांच्या विषयी बोलताय ..??? आणि ते किती टक्के आहेत ...???   सर्वसामान्य मराठ्यांच्या विषयी यांना किती कळवळा आहे ...??? या लोकांना प्रतिनीधी मानून सर्व मराठा सधन वर्गात मोडतो का ...???
        मराठ्यांच्या एकूण लोकसंख्ये पैकी साधारणपणे ३०% मराठा आज भुमीहीन आहे , ५०% मराठा अल्पभुधारक आहे , १५% मराठा मध्यम वर्गीय जीवन जगत आहे तर ५% मराठा ज्यांना सधन म्हणतात अशा वर्गात मोडतो ...!!!
मराठा समाजाच्या अधोगतीची काही प्रमुख कारणे -
* आरक्षण -  सर्वसामान्य मराठा जो भुमीहीन किंवा अल्पभुधारक आहे , ईतका पिचलेला आहे की त्याला कुठली शाश्वत कमाई नाही .मजुरी करुन वा थोड्या फार जमीनीतील उत्पन्नावर उदरनिर्वाह करत आहे . या कचाट्यातुन सुटका मिळवण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण द्यायचे झाले तर आरक्षण नाही तसेच फि भरण्याचीही ऐपत नाही . म्हणजे दोन्ही दरवाजे बंद ...
आई जेवण देत नाही आणि बाप भीक मागु देत नाही ...!!!
अशा कोंडीत सापडलेला सर्वसामान्य मराठा आज हतबल झालेला आहे .
     " अशक्त असलेल्या घोड्यांना वेगळा चारा देण्याच्या नादात पुर्वी जे सशक्त घोडे होते ते रोडावले आहेत ....!!!"   त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज अजूनही कुणाला जाणवल्याचे दिसत नाही ...!!!
   मान्य आहे आरक्षणाने समाजाचे सर्व प्रश्न सुटत नसतात पण गती मिळते हे निश्चित ...!!!
*राजकारणातील स्वकीय्य -
   हे लोक फक्त बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा वोट बँक म्हणून वापर करून घेतात . स्वतः मोठमोठी पदे पदरात पाडून गब्बर होतात . पण ज्यांच्यामुळे आपण या पदावर आहोत त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात ...!!!
अनेक सहकारी क्षेत्रे , शिक्षणसंस्था यांच्याकडे आहेत पण  सर्वसामान्य गरीब मराठ्यांच्या साठी येथे हक्काचे स्थान असावे असे त्यांना कधीही वाटले नाही . शक्य असतानाही गोरगरीब स्वकीय्यांसाठी त्यांनी काही केल्याचे जाणवत नाही ...!!!
विधानसभेत अर्ध्यापेक्षा जास्त आमदार मराठाच असतात तरीही मराठा समाज दुर्लक्षीत राहतो हे कशाचे लक्षण आहे ?

कालबाह्य बेदरकार वृत्ती  -
     २१ व्या शतकात १७ व्या १८ व्या शतका सारखे जगण्याची कला आजही अनेक मराठा तरुणांमध्ये दिसुन �येते...!!!
आजचे युग हे तांत्रिक शिक्षणाचे , स्पर्धेचे युग आहे . येथे पुर्वी असलेला रुबाब वा बेदरकारी वृत्ती बिनकामाची आहे हे बहुतेक मराठा तरुणांनी मनावर घेतल्याचे जाणवत नाही . उच्च शिक्षणाची आस धरून योग्य क्षेत्रात बस्तान बसवने ही काळाची गरज या तरुणांनी लक्षात घ्यायला हवी . शेती धारकांनी कृषी क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतले पाहिजे , आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करायला पाहिजे .ज्यांच्याकडे लागवडी योग्य जमीन नाही त्यांनी ती विकुन वायफळ खर्च करण्या ऐवजी माहीती असलेल्या उद्योगात गुंतवणूक करावी , आपला आर्थिक पाया प्रथम मजबूत करून घ्यावा .
   असे न झाल्याने आज मराठा समाजाचे मागासलेपण प्रकर्षाने जाणवत आहे .
       महाराष्ट्राच्या एकुण लोकसंख्ये पैकी ३५% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाचे उमेदवार तसेच मतदार महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्षात विभागले आहेत , हरकत नाही ...!!!
       आज योगायोगाने म्हणा ,राजकीय खेळी म्हणा किंवा आणि काही म्हणा पण  अनेक वर्षापासून असलेली मराठा समाजाची घुसमट कोपर्डी प्रकरणा पासून बाहेर पडत आहे , मराठा समाज कधी नव्हे तो एकत्र दिसत आहे ... ही चांगल्या गोष्टीची , समाजाच्या हिताची नांदीच म्हणावी लागेल ...!!!
    संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांचे महामोर्चे कुठलेही गालबोट न लागता पार पडत आहेत , प्रतिसाद प्रचंड आहे ...!!!
      हीच एकजुट पुढे टिकवून येणार्या सर्व निवडणुका मधे याचे पडसाद उमटले पाहिजेत, सरकार वर दबाव आला पाहिजे . यासाठी येणार्या सर्व निवडणुकात सत्ताधारी उमेदवारांना पराभुत करण्यासाठी निर्धार केला पाहिजे , येथे आपल्या जाती वा पक्षा विषयी असलेल्या सर्व वृथा भावना दुर सारून सत्ताधारी उमेदवारास तुल्यबळ असलेल्या उमेदवारास आपले बहुमुल्य मत द्यावे लागेल , भले मग तो कुठल्याही पक्षाचा असो वा कुठल्याही जातीचा ...!!!
संपूर्ण समाजाच्या हितासाठी असे कडवट निर्धार करण्याची वेळ आता आली आहे , त्याच्याशिवाय तुमच्याकडे कुणी डुंकूनही पाहणार नाही , अहो प्रत्यक्ष जन्मदाती आई सुद्धा आपल्या लहान बाळाला रडायला लागल्या शिवाय कडेवर घेत नाही , जोपर्यंत खेळतयं , बागडतयं तोपर्यंत ती त्याच्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही ...!!!
महाराष्ट्रात ३५% असलेला मराठा समाज जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सत्ता फिरवू शकतो हे सर्व राजकीय पक्षांना समजुद्या ...!!!
    तुमच्या मतांवर पदे भुषयुन तुमचा वापर फक्त निवडणुका पुरता करणार्या सर्व पक्षीय मराठा नेत्यांना समजुद्या ...!!!
     मग पाहा कसे सगळे खडबडुन जागे होतात ...!!!
    हे एवढे सर्व मराठा बांधवांनी केले तरच " एक मराठा लाख मराठा "  हा एल्गार यशस्वी होईल यात शंका नाही ...!!!
        जयोस्तू जयोस्तू जयोस्तू ... हिंदू - मराठा ...!!!

आपलाच ,
एक मराठा ,
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी , हवेली ( पुणे )

Saturday, 4 February 2017

झांबरे ( Zambare ) आडनावाचा ईतिहास

प्रत्येक जिज्ञासु व्यक्तिला आपल्या पुर्वजांचा ईतिहास माहीती व्हावा ही ईच्छा असते . आपले आडनाव अमुकच कसे ...??? हे ही जाणुन घेण्याची ईच्छा असते ... तशी ती मला ही जाणवली , थोडा शोध केल्यावर थोडीफार माहीती मिळाली ...!!! मला ज्ञात असलेला झांबरे आडनावाचा ईतिहास पुढील प्रमाणे ... शिवपुर्व काळात पवार आडनावाचा सरदार सुमारे ५०० वर्षापूर्वी (किंवा त्याहून अधिक ) महाराष्ट्रात होऊन गेला .त्याच्या कडे झांबरा नावाचा एक पाळलेला कुत्रा होता. हा कुत्रा शिकारीला ,लढाई ला नेहमी या सरदारा सोबत राहत होता . सरदाराला या कुत्र्याचा खूप लळा लागला होता . असेच लढाई ला गेले असता परत येताना हा कुत्रा घरी आला नाही युध्दात कुठे तरी हरवला कि काय ? हे लक्षात आल्यावर सरदार खुप दु:खी झाला ,ईमानी कुत्र्याच्या ,आठवणीने व्याकुळ होऊन शेवटी आजारी पडला . अखेरच्या क्षणी त्याने आपल्या सर्व मुलांना जवळ बोलवले ,आणि त्याच्या प्रिय कुत्र्याच्या स्मृति प्रित्यर्थ त्याने आपले आडनाव पवार ऐवजी झांबरे करावे ... असे मुलांच्या कडुन वचन घेतले ,मुलांनी वचन पाळले, आणि झांबरे हे आडनाव पुढे प्रचलीत झाले ...!!! झांबरे आडनावाची ऐतिहासिक माहिती - शिवपुर्व काळात पुणे (कसबे पुणे ,पुनवडी ) येथील मुळा मुठा नदीच्या काठी झांबरे पाटलांचे टोलेजंग वाडे होते , पाटलांची चावडी होती, येथे पुण्यातील सर्व न्याय निवाडे होत असत . ही झांबरे चावडी आजही पुण्यात कसबा पेठेत आहे . येथील तांबडी जोगेश्वरी उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे . बाल शिवाजी जेंव्हा पहिल्यांदा जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शहाजी राजांच्या सांगण्या वरून पुणे परगण्याची व्यवस्था पाहण्यासाठी पुण्यात आले तेंव्हा सुरूवातीला झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत होते . पुढे झांबरे पाटलांच्या जागेत लालमहाल बांधुन तिथे निवास व्यवस्था करण्यात आली ...!!! पानिपतच्या तिसर्या युध्दात सरदार शहाजी (सहजी ) झांबरे हे पंचहजारी मनसबदार पेशव्यांचे सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्या बरोबर सामिल होते ...!!! पेशवे कालीन शाहीर सगनभाऊ यांनी आपल्या पानिपतच्या पोवाड्यात सरदार झांबरे यांचा ऊल्लेख शुर अतिरथी असा केल्याचे आढळते ...!!! पुण्यात कसबा पेठेतील झांबरे चावडी व मुकुंदनगर येथील झांबरे पँलेस या वास्तु पुण्यातील आकर्षण मानले जाते . मंगळवार पेठेत एका रस्त्याचे नाव ज्येष्ठ गांधीवादी श्री . तात्यासाहेब रामराव झांबरे पाटील असे आढळते . हडपसर पुणे जवळील झांबरेपाटील नगर , होळकरवाडी येथे श्री. अनंत दिगंबर झांबरे पाटील यांच्या तर्फे "पतंजलि योग विद्याश्रम" नावाने सुप्रसिद्ध योग केन्द्र चालवले जाते .हज़ारों लोक ईकडे योग विद्या आत्मसात करून निरोगी आणि आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहेत ...!!! झांबरे कुटुम्बियांचे सध्याचे वास्तव्य - झांबरे कुटुम्बियांचे सध्याचे वास्तव्य पुणे शहरात आहे तसेच हडपसर जवळील होळकरवाडी ता . हवेली जि. पुणे या गावात जवळपास ७०% झांबरे आडनावाचे लोक वास्तव्यास आहेत .डोंगरसोनी ता . तासगाव जि . सांगली येथेही झांबरे कुटुम्बिय मोठ्या प्रमाणात आहेत . सोलापुर, जळगाव, भुसावळ व वाशीम या शहरांच्या ठिकाणी ही झांबरे आडनाव अधिक प्रमाणावर आढळून येते ...!!! My email - ravindrakzambare@gmail.com संदर्भ- राजा शिवछत्रपती- लेखक, महाराष्ट्र भुषण आदरणीय श्री बाबासाहेब पुरंदरे. पानिपत - लेखक, श्री विश्वास पाटील पानीपतचा पोवाडा - पेशवे कालीन शाहीर सगनभाऊ. हे ही पाहा ...... http://www.google.co.in/url?q=http://googleweblight.com/%3Flite_url%3Dhttp://www.maayboli.com/node/38694%26ei%3DOTjOj_UT%26lc%3Den-IN%26geid%3D10%26s%3D1%26m%3D518%26ts%3D1454775605%26sig%3DALL1Aj4WTgBzZNRHtJL24Kd6KOY0fEecdA&sa=U&ved=0ahUKEwiJ9K65xePKAhXIOj4KHXmVA7cQFggPMAA&sig2=33sOWkS0kWVdnfDYh0SrKw&usg=AFQjCNHGphKZY3y72EmjxGwuv26iWdbVrA http://www.google.co.in/url?q=https://m.facebook.com/permalink.php%3Fid%3D513781378661367%26story_fbid%3D555231067849731&sa=U&ved=0ahUKEwiZ_LK2v-PKAhVDOj4KHQk6D7gQFggPMAA&sig2=W_8NhfvSRrChEoCjbNWvuw&usg=AFQjCNFriWGC7DSud5pM2RC-n0tqjsFV4w http://www.google.co.in/url?q=http://googleweblight.com/%3Flite_url%3Dhttp://www.dadojikonddeo.org/lekh.html%26ei%3DZdSreO3E%26lc%3Den-IN%26geid%3D10%26s%3D1%26m%3D518%26ts%3D1454773379%26sig%3DALL1Aj4WFM51_zVeTfPaj3bnznUw5NMHzA&sa=U&ved=0ahUKEwir_vCTvePKAhVMWz4KHe29ALkQFggiMAU&sig2=1Cq3lVQWlc13BIAgmYnuRQ&usg=AFQjCNE6eDKO2DAmm51nuYMduuzohfpvcg

ये हंसा वरती

ये हंसा वरती बसून शारदे
====================
ये हंसा वरती बसून शारदे
मयुरा वरती बसून ...
नेसुनी शुभ्र पातळ
गळा घालून मुक्ताफळं
कटी कंबरपट्टा कसुन शारदे
मयुरा वरती बसुन ...
करी घेऊनीया विना
करी मंजुळ गायना
ये सभेमध्ये हसून शारदे
मयुरा वरती बसून ...
तुका म्हणे ब्रम्हनंदीनी
मम् ह्रदयी विराजुनी
ये अंतर्ज्ञाना ठसुन शारदे
मयुरा वरती बसून ...!!!